Join us  

टाटांच्या कंपनीनं रचला इतिहास; देशातल्या कुठल्याच कंपनीला न जमलेला पराक्रम 'करून दाखवला'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 1:38 PM

देशातली दिग्गज आयटी कंपनी असलेल्या टीसीएसनं सोमवारी बाजार उघडताच नवा इतिहास रचला. 100 बिलियन बाजार भांडवल असलेली टीसीएस ही भारतातील एकमेव कंपनी बनली आहे.

नवी दिल्ली- देशातली दिग्गज आयटी कंपनी असलेल्या टीसीएसनं सोमवारी बाजार उघडताच नवा इतिहास रचला. 100 बिलियन बाजार भांडवल असलेली टीसीएस ही भारतातील एकमेव कंपनी बनली आहे. शेअर बाजार उघडताच सकाळी 9.49 वाजता कंपनीचं बाजार मूल्य 6,62,726.36 कोटी रुपयांच्या स्तरावर पोहोचलं.सोमवारी टीसीएसचे शेअर्स 4.41 टक्क्यांपर्यंत गेल्यानं त्यांनी 140 अंकांपर्यंत उसळी घेतली. शुक्रवारी बाजार बंद होते वेळी टीसीएसचे शेअर 3,402 स्तरावर पोहोचले होते. त्यानंतर आज सोमवारी टीसीएसच्या शेअर्स 3,424पर्यंत अंकांवर पोहोचले. पहिल्या तासाभरात शेअर्स 3545पर्यंत पोहोचले होते. टीसीएसनं इतर कंपन्यांना पछाडत ही उंची गाठली आहे. टीसीएसचं बाजार भांडवल इतर आयटी इंडेक्स कंपन्यांच्या तुलनेत 52 टक्क्यांहून अधिक आहे.2010मध्ये टीसीएसचं भागभांडवल 2500 कोटी रुपयांच्या घरात होतं. त्यानंतर 2013मध्ये 50,000 कोटींपर्यंत टीसीएसनं मजल मारली होती. तर 2014पर्यंत टीसीएसची उलाढाल 75,000 कोटींपर्यंत गेली होती. त्या खालोखाल एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, एनटीपीसी, ओएनजीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा स्टील, पॉवर ग्रीड, भारती एअरटेल, मारुती सुझुकी, एल अँड टी, अ‍ॅक्सिस बँक, सिप्ला, आयटीसी, एचडीएफसी लिमिटेड, डॉ. रेड्डीज यांचेही शेअर्स वाढले आहेत. 

टॅग्स :रतन टाटाटाटा