Join us
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमध्ये वर्क्स कॉन्ट्रॅक्टची कर पात्रता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 04:20 IST

करनीती भाग-२८३

उमेश शर्मा । सीए

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटीतील वर्क्स कॉन्ट्रॅक्टमध्ये कोणते बदल करण्यात आले?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, अलीकडेच रिअल इस्टेटसंदर्भात नवीन कराची प्रक्रिया आणि कर दर अधिसूचीत करण्यात आले. या अधिसूचनांनी रिअल इस्टेटच्या संबंधात प्रदान केलेल्या बांधकाम सेवांमध्ये बदल आणले आहे. वर्क्स कॉन्ट्रॅक्ट संबंधीतील नवीन कर दर १ एप्रिल, २०१९ पासून लागू केले आहे.अर्जुन: कृष्णा, जीएसटीमध्ये वर्क्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय ?कृष्ण: अर्जुना, वर्क्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे असे कॉन्ट्रॅक्ट, जेथे वस्तूंच्या किंवा अन्य स्वरूपात मालमत्ता हस्तांतरण केले जाते. इमारत बांधकाम, लोखंड काम, जोडणी, सुधारणा, बदल, दुरुस्ती, देखभाल, नूतनीकरण करणे, बदल आणणे किंवा कोणत्याही स्थावर मालमत्तेसाठी मध्यस्थी करणे त्यात समाविष्ट होईल.अर्जुन: कृष्णा, वर्क्स कॉन्ट्रॅक्टसाठी नवीन करांचा दर कोणता?कृष्ण: अर्जुना, वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सेवेवर पूर्वी (विशेषत: प्रदान केल्याशिवाय) १८ टक्के दराने जीएसटी लागू केला जात होता. नवीन कर दर सेवेत खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत.१. जर वर्क्स कॉन्ट्रॅक्टची सेवा अफोर्डेबल रेसिडेंशल अपार्टमेंटच्या बांधकामासाठी प्रधान केली असेल, तर त्यावर १२ टक्के दराने जीएसटी लागू केला जाईल.२. वरील दिलेल्या सेवांच्या व्यतिरिक्त जर वर्क्स कॉन्ट्रॅक्टची सेवा पुरविली गेली असेल, तर त्यावर १८ टक्के दराने जीएसटी लागू होईल.अर्जुन: कृष्णा, अफोर्डेबल रेसिडेश्नल अपार्टमेंट म्हणजे काय?कृष्ण: अर्जुना, अफोर्डेबल रेसिडेंशल अपार्टमेंट म्हणजे, ज्याचे कार्पेट एरिया महानगरांमध्ये ६० चौरस मीटर आणि महानगर नसलेल्या शहरांमध्ये ९० चौरस मीटरपर्यंत असून, ज्यांचे मूल्य ४५ लाखांपर्यंत आहे.अर्जुन: कृष्णा, बांधकाम व्यावसायिकांना कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील?कृष्ण : अर्जुना, एकूण प्रकल्पाचे कार्पेट क्षेत्र अफोर्डेबल रेसिडेंशल अपार्टमेंटसाठी ५० टक्क्यांहून अधिक असेल आणि त्यासाठी प्रदान केलेल्या वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सेवेवर १२ टक्के दराने जीएसटी लागू केला जाईल. जर वरील दिलेली ५० टक्क्यांची अट, तसेच प्रकल्प अफोर्डेबल रेसिडेंशल अपार्टमेंटसाठीदिलेल्या अटीमध्ये बसत नसेल, तर बांधकाम व्यावसायिकांना आरसीएमअंतर्गत जीएसटी भरावा लागेल. सेवा कर लागू होणाऱ्या दरानुसार आणि प्रत्यक्षात देय कर यांच्यातील फरकांचा समान जीएसटी भरावा लागेल.अर्जुन: कृष्णा, जमीनदार बांधकाम व्यावसायिकांना विकास अधिकार प्रदान करतो आणि त्या बदल्यात बांधकाम केलेले काही फ्लॅट, दुकाने इत्यादी प्राप्त करत असेल, तर त्यावर कर लागू होईल का?कृष्ण: अर्जुना, जर बांधकाम व्यावसायिक जमीनदारांकडून अफोर्डेबल हाउसिंग सोसायटीमधील फ्लॅट, दुकाने इत्यादी प्राप्त करत असेल, तर त्यावर १ टक्के दराने जीएसटी भरावा लागेल आणि अफोर्डेबलहाउसिंग सोसायटी व्यतिरिक्त प्राप्त केलेल्या. फ्लॅट,दुकाने, इत्यादीवर ५ टक्के दराने जीएसटी लागू केला जाईल.अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सेवेची करपात्रता ही बांधकाम व्यावसायिकांना सावधगिरीने कार्य करा, अशी सांगणारी आहे. बांधकाम व्यावसायिकांनी वर्क्स कॉन्ट्रॅक्टवर कार्य करताना काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून वर्क्स कॉन्ट्रॅक्ट करार अडचणीचा होणारनाही.

टॅग्स :जीएसटी