Join us

टाटाच्या कंपनीने कमाल केली; HDFC ला पछाडून देशाची व्हॅल्यूएबल ब्रँड बनली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 14:50 IST

सर्व ब्रँड देशांतर्गत आणि जागतिक ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासोबतच भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठी भूमिका बजावत आहेत.

टाटा ग्रुपने गेल्या काही वर्षांत मोठी घोडदौड केली आहे. ऑटो असेल किंवा रिटेल किंवा आयटी साऱ्याच क्षेत्रात ग्राहकांती विश्वासार्हता जपली आहे. टाटाच्या एका बड्या कंपनीने एचडीएफसीला मागे टाकून देशातील सर्वात मौल्यवान कंपनी बनण्याचा मान मिळविला आहे. 

मार्केटिंग डेटा आणि अॅनालिसीस कंपनी कांतारने Kantar BrandZ Top 75 Most Valuable Indian Brands 2022 यादी जाहीर केली आहे. यानुसार टाटाची टीसीएस ही कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे. टीसीएस भारतात जरी पहिल्या क्रमांकावर असली तरी आशियाई बाजारात दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीसीएसची ब्रँड व्हॅल्यू 45,519 मिलियन डॉलर एवढी आहे. ती २०२० ते २०२२ या काळात २१२ टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे टीसीएसने यादीत दोघांना मागे टाकले. आशियाई बाजारात सॅमसंगनंतर टीसीएसची ब्रँड व्हॅल्यू झाली आहे. 

एचडीएफसी बँक आता कंटारच्या या यादीत मूल्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. TCS ने बिजनेस सोल्यूशंस आणि टेक्नोलॉजी प्रोव्हायडर्स सेवांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून टॉप-6 भारतीय ब्रँडमध्ये आघाडी मिळविली आहे. हे सर्व ब्रँड देशांतर्गत आणि जागतिक ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासोबतच भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठी भूमिका बजावत आहेत.

भारताचे टेक ब्रँड्स आता राष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी योगदान देणाऱ्या प्रमुख कंपन्याच राहिलेल्या नाहीत, तर बेंचमार्क बनले आहेत. तांत्रिक कौशल्य, नवकल्पना आणि कामगार कौशल्ये जागतिक स्तरावर नेली आहेत. FY22 मध्ये भारतीय टेक क्षेत्राने २०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला होता. याच वर्षात अन्य उद्योग क्षेत्रांनी दोन आकडीच वाढ नोंदविली होती. TCS ने जून तिमाहीतील निव्वळ नफ्यात 5.2 टक्के आणि महसुलात 16 टक्के वाढ नोंदवली होती.  

टॅग्स :टाटा