Join us
Daily Top 2Weekly Top 5

Tata Trusts New CEO: टाटा ट्रस्टमध्ये खांदेपालट! सिद्धार्थ शर्मा नवे सीईओ; अपर्णा उप्पलुरी सीओओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 19:32 IST

टाटा ट्रस्टच्या वतीने निवेदन जारी करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

टाटा ट्रस्टमध्ये खांदेपालट झाली आहे. सिद्धार्थ शर्मा टाटा ट्रस्टचे नवे सीईओ बनले आहेत. तर सीओओपदावर अपर्णा उप्पलुरी यांची वर्णी लागली आहे.

शर्मा आणि उप्पलुरी यांची नियुक्ती 1 एप्रिल 2023 पासून होणार आहे. टाटा ट्रस्टच्या वतीने निवेदन जारी करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

शर्मा दोन दशकांहून अधिक काळ सरकारी सेवेत होते. त्यांनी सरकारच्या महत्त्वाच्या मंत्रालयांमध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी देशाचे १३ आणि १४ वे राष्ट्रपतींचे आर्थिक सल्लागार म्हणून काम केले आहे. यानंतर ते टाटा ग्रुपमध्ये सहभागी झाले होते. 

अपर्णा उप्पलुरी या परोपकार, महिला हक्क, सार्वजनिक आरोग्य, कला आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये धोरणात्मक नियोजन आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या एक प्रतिष्ठित व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे देखील २० वर्षांचा अनुभव आहे. फोर्ड फाऊंडेशनमध्ये त्यांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. 

टॅग्स :टाटा