Join us  

Multibagger Penny Stock: TATA कंपनीच्या 'या' स्टॉकनं केलं मालामाल; २ वर्षात १ लाखाचे झाले ६० लाख रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 2:14 PM

सामान्यत: पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणं धोक्याचं मानलं जातं. पेनीस्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी अनेकदा विचार करावा असा सल्ला देखील अॅनालिस्ट देत असतात.

नवी दिल्ली-

सामान्यत: पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणं धोक्याचं मानलं जातं. पेनीस्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी अनेकदा विचार करावा असा सल्ला देखील अॅनालिस्ट देत असतात. याचं प्रमुख कारण म्हणजे पेनी स्टॉक वोलेटाइल असतात आणि एका क्षणात गुंतवणूकदाराची संपूर्ण कमाई स्वाहा होऊ शकते. पण कंपनीची कामगिरी चांगली असेल तर शेअरचा भाव कमी असताना गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे देखील आहेत. टाटा समूहाच्या Tata Teleservices (Maharashtra) Ltd चं देखील अशीच कहाणी आहे. 

टीटीएमएल स्टॉक (TTML Stock Price) ची गेल्या काही महिन्यांमधली कामगिरी पाहिली तर हा स्टॉक करेक्शनचा शिकार ठरत आहे. पण असं असलं तरी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी या स्टॉकचा विचार करुन नफा कमावण्यासाठी मदत होते. बरोबर दोन वर्षांपूर्वी बीएसईवर या स्टॉकचा भाव फक्त २.४० रुपये इतका होता. आज याच कंपनीचा स्टॉक बीएसईवर ४.६६ टक्क्यांच्या वृद्धीसह १४५.४० रुपयांवर व्यवहार करत आहे. याचा अर्थ असा की गेल्या दोन वर्षात टीटीएमएलच्या शेअरन ५,९५४ टक्के रिटर्न्स दिले आहेत. एखाद्या गुंतवणूकदारानं २ वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते तर सध्याचा त्याचा पोर्टफोलिओ या गुंतवणुकीची व्हॅल्यू ६० लाख रुपयांपेक्षाही अधिक असते. 

वर्षभरात १ हजार टक्क्यांची तेजी११ जानेवारी २०२२ रोजी या स्टॉकनं आपली आजवरची सर्वोत्तम किंमत गाठून २९०.१५ रुपये स्तरावर जाऊन पोहोचला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत याच स्टॉकमध्ये ५० टक्क्यांची घसरण देखील नोंदविण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात या स्टॉकचा भाव २७ टक्के पडला आहे. पण आता पुन्हा एकदा भरपाईच्या मार्गावर स्टॉक असल्याचं दिसून येत आहे. गेल्या पाच दिवसांत टीटीएमएलच्या स्टॉकमध्ये ९.५० टक्क्यांची तेजी पाहायला मिळत आहे. लाँग टर्मबाबत बोलायचं झालं तर ६ महिन्यात यात १०७ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. तर गेल्या १ वर्षात हाच स्टॉक जवळपास १ हजार टक्क्यांनी वधारला आहे. 

अशी आहे कंपनीची आर्थिक कामगिरीटीटीएमएल कंपनीचा सध्याचा मार्केट कॅप २८,४६३.७५ कोटी रुपये इतका आहे. मार्च २०२२ च्या तिमाहीत कंनपीचं नुकसान कमी होईल २८०.६२ कोटी रुपये इतकं होतं. याआधी डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीला ३०२.३० कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. कंपनीची कमाई देखील त्यावेळी २८४.२२ कोटी रुपयांनी कमी होऊन २७२.७८ कोटी रुपये इतकी झाली होती. २०२१-२२ या आर्थिक वर्षात कंपनीची आर्थिक उलाढाल १,०९३.८० कोटी रुपये राहिली. तर कंपनीला या काळात १,२१५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

टॅग्स :टाटाशेअर बाजार