Join us

Cyrus Mistry : याच वर्षी सायरस मिस्त्रींच्या वडिलांचं झालं होतं निधन, पाहा कुटुंबात आहेत कोण कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 22:51 IST

Cyrus Mistry Accident Latest News & Updates : रविवारी सायरस मिस्त्री यांचं झालं अपघाती निधन.

उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचं रविवारी दुपारच्या सुमारास अपघाती निधन झालं. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाने उद्योग जगताला मोठा धक्का बसला आहे. २०२२ हे वर्ष पालोनजी कुटुंबीयांसाठी अतिशय वाईट ठरलं आहे.

याच वर्षी जून महिन्यात भारतातील दिग्गज उद्योजकांपैकी एक असलेले बिझनेस टायकून आणि सायरस मिस्त्री यांचे वडिल पालोनजी मिस्त्री यांचं निधन झालं. त्यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर आता सायरस मिस्त्री यांच्या निधनानं पालोनजी कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

सायरस मिस्त्री आणि त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये सायरस मिस्त्री यांच्या आई पाट्सी पेरिन डुबास, शापूर मिस्त्री यांच्याशिवाय त्यांच्या दोन बहिणी लैला मिस्त्री आणि अलू मिस्त्री, सायरस मिस्त्री यांच्या पत्नी रोहिका आणि त्यांची दोन मुले फिरोज आणि जहान मिस्त्री हे आहेत. शापूर मिस्त्री हे सायरस मिस्त्री यांचे मोठे बंधू आहेत.

टाटा समुहाचे माजी अध्यक्ष २००६ मध्ये सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे सदस्य बनले. त्यानतर २०१३ मध्ये त्यांच्याकडे टाटा समुहाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. परंतु २०१६ मध्ये झालेल्या वादानंतर त्यांना या पदावरून हटवण्यात आलं. सायरस मिस्त्री यांचे आजोबा शापूरजी मिस्त्री यांनी दोराबजी टाटा यांच्याकडून टाटा समूहातील १८.५ टक्के हिस्सा विकत घेतला होता.

टॅग्स :टाटासायरस मिस्त्री