Join us  

Tata Sky वापरताय?; १५ वर्षांनंतर होणार बदल, कंपनीनं घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 10:50 PM

आता टाटा स्कायमध्ये एक मोठा बदल होणार आहे.

तुम्ही टाटा स्काय (Tata Sky) हे नाव ऐकलंच असेल. परंतु आता टाटा स्कायमध्ये एक मोठा बदल होणार आहे आणि कंपनीनं तसा निर्णयही घेतला आहे. 'इस को लगा डाला तो लाईफ झिंगा लाला' हे त्यांचं स्लोगन आपणं टीव्हीवर कधी ना कधी पाहिलं असेल किंवा अनेकांकडे टाटा स्कायचं कनेक्शनही असेल. परंतु आता कंपनी आपल्या नावातून स्काय हा शब्द हटवणार आहे. आता कंपनीचं नवं नाव टाटा प्ले (Tata Play) असेल. इतकंच नाही, तर याव्यतिरिक्तही काही बदल तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. 

टाटा स्कायचे सध्या १९ दशलक्षांहून अधिक सक्रिय ग्राहक आहेत. कंपनी आता डीटीएच सेवेशिवाय फायबर-टू-होम ब्रॉडबँड आणि बिंजमध्ये व्यवसाय करत आहे. Tata Play Binge वर १४ प्रमुख OTT अॅप्स समाविष्ट आहेत. "आम्ही सुरूवातीला एक डीटीएच कंपनी म्हणून सुरूवात केली होती. परंतु आता आम्ही कंन्टेन्ट डिस्ट्रिब्युटर कंपनी बनलो आहोत. ग्राहकांच्या गरजा बदलत होत्या आणि ते ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा वापर करत होते. आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार करण्याचा विचार केला होता आणि ग्राहकांना इंटिग्रेटेड एक्सिपिरिअन्स देऊ इच्छित होतो. यासाठी आम्ही बिंज लाँच केलं आणि विशिष्ट ब्रॉडबँड व्यवसायही करत आहोत," अशी प्रतिक्रिया टाटा प्ले चे एमडी आणि सीईओ हरित नागपाल यांनी दिली.

फोटो सौजन्य - टाटा स्काय (टाटा प्ले)

डीटीएच आपला तेजीनं वाढणारा व्यवसाय आहे आणि तो मोठा व्यापार कायम राहील. चक ओटीटीचाही विस्तार होणार आणि याप्रकारे ही ब्रँडची ओळख निर्माण करण्याची वेळ आणि तो व्यवसाय डीटीएचपेक्षा निराळा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कंपनीबाबत अधिक माहितीटाटा सन्स आणि रुपर्ट मर्डॉकच्या मालकीच्या 21st Century Fox यांच्यातील ८०:२० जॉईंट व्हेन्चरच्या रुपात लाँच झाल्यानंतर Tata Sky ने 2006 मध्ये सेवा सुरू केली. त्यानंतर, फॉक्स आणि टाटा समूहाने टीएस इन्व्हेस्टमेंट्सची स्थापना केली, ज्यांचा टाटा स्कायमध्ये २० टक्के हिस्सा आहे. यामुळे फॉक्सला ९.८ टक्क्यांची अतिरिक्त अप्रत्यक्ष भागीदारी मिळाली. नंतर, जेव्हा मर्डोक यांनी फॉक्सचा मनोरंजन व्यवसाय वॉल्ट डिस्ने कंपनीला विकला तेव्हा टाटा स्कायमधील स्टेकदेखील कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला.

टॅग्स :टाटाभारत