Join us

टाटांची परदेशात मोठी डील, १०० मिलयन डॉलर्समध्ये 'ही' कंपनी घेतली विकत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 17:35 IST

टाटा कम्युनिकेशन्सने अमेरिका स्थित एंटरप्राइझ मेसेजिंग फर्मच्या अधिग्रहणाची घोषणा केली आहे.

टाटा कम्युनिकेशन्सने अमेरिका स्थित एंटरप्राइझ मेसेजिंग फर्म kaleyra च्या अधिग्रहणाची घोषणा केली आहे. 100 मिलियन डॉलर्समध्ये ही कॅश डील करण्यात आलीये. प्रति शेअर 7.25 डॉलर्स दरानं ही कंपनी विकत घेतल्याची माहिती टाटा समूहाकडून देण्यात आली. कंपनी NYSE-सूचीबद्ध कंपनी kaleyra कडून 224.9 मिलियन डॉलर्सचं ग्रॉस डेट आणि 149.9 मिलियन डॉलर्सच्या नेट डेटचं देखील अधिग्रहण करणार आहे.

हा व्यवहार टाटा कम्युनिकेशन्सना मजबूत क्षमता आणि स्केलसह एक नवीन व्यासपीठ देणार आहे. सहा ते नऊ महिन्यांत व्यवहार पूर्ण झाल्यावर, कालेरा ही टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडची उपकंपनी बनेल.

कशी आहे आर्थिक स्थिती?31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या वर्षामध्ये kaleyra नं 339.2 मिलियन डॉलर्सचा महसूल मिळवला. तर दुसरीकडे मार्च तिमाहीत टाटा कम्युनिकेशन्सच्या निव्वळ नफ्यात 11 टक्क्यांची घट होऊन ती आता 326 कोटी रुपये झाली आहे. त्याचवेळी कंपनीचं उत्पन्न 4,586.66 कोटी रुपये झालं आहे. कंपनीचा डेटा महसूल आर्थिक वर्ष 2027 पर्यंत दुप्पट होऊन 28,000 कोटी रुपये होईल. ही वार्षिक 18 टक्के वाढ असेल अशी कंपनीला अपेक्षा आहे.

टॅग्स :टाटाव्यवसाय