Join us  

Tata Play ब्रॉडबँडमध्ये Jio ला देणार टक्कर; मोफत मिळतंय ११५० रुपयांचं कनेक्शन आणि बरंच काही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2022 5:35 PM

ग्राहकांसाठी कंपनीनं आणली नवी योजना. पाहा काय आहे त्यात.

टाटा प्ले फायबर (Tata Play Fiber), पूर्वी टाटा स्काय ब्रॉडबँड (Tata Sky Broadband) म्हणून ओळखले जात होते. परंतु आता कंपनी ग्राहकांना 1150 रुपयांचा प्लॅन ग्राहकांना एका महिन्यासाठी मोफत देत आहे. या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना 200Mbps डाऊनलोड आणि अपलोड स्पीडसोबत हाय स्पीड कनेक्शन मिळेल. हा प्लॅन कंपनी ऑफर करत असलेल्या JioFiber च्या 'Try and Buy' प्लॅनप्रमाणेच आहे. टाटा प्ले सुरूवातीला आपल्या ग्राहकांना सर्व्हिस क्वालिटी टेस्ट करणं आणि त्यानंतर सेवा आवडल्यास खरेदी करण्यास सांगत आहे.

Tata Play Fiber सेवांच्या अटी शर्थीTata Play Fiber युझर्सना 200 Mbps प्लॅन मोफत हवा असल्यास, त्यांना कंपनीला 1500 रुपयांचं रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागेल. यामध्ये ग्राहकांना 1000 जीबी हाय स्पीड डेटा देण्यात येतो. परंतु हे रिफंड मिळवण्यासाठी ग्राहकांना 30 दिवसांच्या आतच कनेक्शन रद्द करावं लागेल. टाटा प्ले फायबर टेस्टिंग दरम्यान, ग्राहकांना मोफत लँडलाईन कनेक्शनही देण्यात येईल.

जर ग्राहकाने 30 दिवसांची सेवा घेतल्यानंतर कनेक्शन रद्द केले, तर त्याच्याकडून 500 रुपये आकारले जातील आणि सुरक्षा ठेवीतून 1,000 रुपये परत केले जातील. याशिवाय ग्राहकांनी कनेक्शन रद्द करण्याऐवजी कंपनीने ऑफर केलेल्या प्लॅन्सपैकी एक निवडल्यास त्यांना उत्तम ऑफर मिळू शकतात. जर वापरकर्त्याला 100 एमबीपीएस प्लॅन किमान तीन महिन्यांसाठी घ्यायचा असेल, तर त्याला पूर्ण 1500 रुपये परत केले जातील. परंतु तीन महिन्यांसाठी 50 Mbps प्लॅनसह मिळणारा रिफंड 500 रुपये असेल आणि 1000 रुपयांचं सिक्युरिटी जि वॉलेटमध्ये राहील.

यांना मिळेल Tata Play Fiber चा फायदायुझर्सनं मंथली प्लॅन निवडल्यास, त्यांना तीन महिन्यांच्या सक्रिय सेवेनंतर 1000 रुपये परत केले जातील आणि 500 ​​रुपये वॉलेटमध्ये राहतील. TRAI & BUY योजना ही कंपनीची प्रमोशनल ऑफर आहे आणि ती फक्त नवी दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, ग्रेटर नोएडा, मुंबई आणि देशातील निवडक भागात उपलब्ध आहे.

टॅग्स :टाटारिलायन्स जिओ