Join us  

Tata motors: टाटा मोटर्सच "लय भारी", हरयाणा रोडवेजकडून १००० बसेसची ऑर्डर जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 8:40 PM

हरयाणा सरकारच्या या ई-टेंडर प्रक्रियेला पूर्ण केल्यानंतरच टाटा कंपनीला ही ऑर्डर मिळाली आहे. 

चंदीगड - देशातील सर्वात मोठी वाहननिर्मित्ती करणाऱ्या टाटा मोटर्सला हरयाणा सरकारकडून मोठी ऑफर्स मिळाली आहे. हरयाणा रोडवेजकडून टाटा मोर्टर्सला १००० बस बनविण्यासाठीचं कंत्राट देण्यात आलं आहे. या करारानुसार टाटा मोर्टर्स ५२ सीट्स असलेल्या बीएस ६ डिझेलच्या बसची निर्मित्ती करणार आहे. टाटा मोटर्सची बसेस ह्या प्रवाशांसाठी अत्याधुनिक, आरामदायी असतात. तसेच, उच्चतम इंधनक्षमता आणि कमी किंमतीमुळे ऑटो क्षेत्रात नावलौकिक आहेत. हरयाणा सरकारच्या या ई-टेंडर प्रक्रियेला पूर्ण केल्यानंतरच टाटा कंपनीला ही ऑर्डर मिळाली आहे. 

हरयाणा परिवहन विभागाचे मुख्य सचिव नवदीपसिंह वर्क यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आम्हाला ही बाब सांगताना अतिशय आनंद होत आहे की, टाटा मोटर्स कंपनीला १००० बसेसची ऑर्डर देण्यात आली आहे. या बसेस प्रवाशांना अत्याधुनिक आणि आरामदायी सेवा पुरवणार आहेत. त्यामुळे, हरयाणात एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी नागरिकांचा प्रवास सुखद होणार आहे. 

टाटा मोटर्सच्या प्रोडक्ट लाईन बस विभागाचे प्रमुख रोहित श्रीवास्तव यांनीही या १००० बसेसच्या ऑर्डरला दुजोरा दिला. तसेच, टाटा मोटर्सलाही मोठा आनंद आहे की, हरयाणा रोडवेजकडून एवढी मोठी ऑर्डर कंपनीला मिळाली आहे. हरयाणा सरकारसोबतच्या या करारामुळे राज्य सरकारसोबत कंपनीचे व्यवसायिक संबंध अधिक दृढ होतील. येथील नागरिकांची सार्वजनिक वाहतूक सुविधा अधिक सक्षम आणि उत्तम करण्यासाठी हा करार एक चांगलं माध्यम असेल. आमच्या बसेसच्या माध्यमातून नागरिकांना उत्तम, आरामदायी प्रवास सेवा पुरविण्यास आम्ही कटीबद्ध आहोत, असेही श्रीवास्तव यांनी म्हटले.

टाटा मोटर्समध्ये वाहनांना 'पॉवर ऑफ ६' या सिद्धांतानुसार गाडींचे डिझाईन आणि निर्मित्ती केली जाते. वाहनांची ठेवण, गाडीला उच्चतम बनविण्यासाठी रिपेअर टाईम इंश्युरन्स, ब्रेकडाऊन अस्सिटंस, इंश्युरन्स आणि एक्सीडेंट रिपेयर टाइम, एक्सटेंडेंट वारंटी आणि अन्य एड-ऑन सेवांचा समावेश आहे. 

टॅग्स :टाटाहरयाणासार्वजनिक वाहतूकरतन टाटा