अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदलणाऱ्या कर धोरणामुळे जगभरातील वस्तू व्यापारात ०.२ टक्क्यांची घसरण होऊ शकते, असा इशारा जागतिक व्यापार संघटनेने (डब्ल्यूटीओ) दिला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या टार्गेटवरील ७० पेक्षा अधिक देशांवर शुल्क लावण्याचा निर्णय रेटलाच तर जागतिक व्यापारात १.५ टक्क्यांपर्यंत घसरण होऊ शकते. ‘डब्ल्यूटीओ’नं दिलेल्या माहितीनुसार, सध्या जागतिक व्यापारात घसरगुंडीचा कल सुरू आहे. अमेरिकी क्षेत्रात कठोर कर व्यवस्था नसली तरीही घसरण पाहायला मिळेल. यंदा येथील निर्यात १२.६% आणि आयात ९.६ % घसरण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांच्या टॅरिफने सगळी परिस्थितीच बदलून गेली
‘डब्ल्यूटीओ’ने २१ एप्रिलपर्यंतच्या सीमा शुल्क स्थितीच्या आधारे हा अहवाल जारी केला आहे. वास्तविक आधीच्या अंदाजात ‘डब्ल्यूटीओ’नं जागतिक बाजारात वृद्धी अनुमानित केली होती. ट्रम्प यांनी समतुल्य सीमा शुल्क लावल्यानंतर मात्र परिस्थितीच बदलून गेली आहे.
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
९० दिवसांनंतरही अनिश्चितता कायम
चीन वगळता इतर देशांवर लावण्यात आलेल्या सीमा शुल्कास अमेरिकेने ९० दिवसांची स्थगिती दिली असली, तरी अजूनही अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे. जागतिक वृद्धीला फटका बसण्याचा धोकाही कायम आहे. त्यामुळे जगातील कमजोर अर्थव्यवस्थांवर गंभीर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया ‘डब्ल्यूटीओ’च्या महासंचालक नगोजी ओकोन्जो-इवेला यांनी दिली. अभ्यासानुसार असं दिसून येत आहे की, व्यापारी धोरणातील अनिश्चिततेचा व्यापारप्रवाहावर नकारात्मक परिणाम होतो. निर्यात घटते आणि आर्थिक घडामोडी कमकुवत होतात.