Join us  

बुलेट घेताय ? जरा थांबा, रॉयल एन्फिल्ड घेऊन येतेय 160 किमी स्पीडवाले 2 'जबरदस्त मॉडेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 12:07 PM

रॉयल एन्फिल्ड कंपनीच्या म्हणण्यानुसार, इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेन्टल जीटी 650 बुलेटमध्ये देण्यात आलेले हे इंजन 160 किमी प्रतितास पेक्षाही जास्त वेगवान असणार आहे.

नवी दिल्ली - रायल एन्फील्ड कंपनीकडून आपल्या दोन नवीन बुलेटचे लाँचिंग करण्यात येत आहे. Interceptor 650 आणि Continental GT 650 नावाने या दोन्ही बुलेटचे लाँचिंग होत आहे. या दोन्ही बुलेटमध्ये 648cc सीसी एवढे दमदार इंजिन असणार आहे. विशेष म्हणजे, या बुलेटचे इंजिन हे रॉयल एन्फील्डनच्या दुचाकींमधील सर्वात शक्तिशाली इंजिन असणार आहे. 

रॉयल एन्फिल्ड कंपनीच्या म्हणण्यानुसार, इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेन्टल जीटी 650 बुलेटमध्ये देण्यात आलेले हे इंजन 160 किमी प्रतितास पेक्षाही जास्त वेगवान असणार आहे. या बुलेटचे इंजिन 25.5 किमी प्रतिलीटर एवढा मायलेज देईल. रॉयल एन्फील्ड इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेन्टल जीटी 650 बुलेटमध्ये 648cc, एयरकूल्ड, एसओएचसी, फ्यूल इंजेक्टेड पॅरलल-ट्विन इंजन देण्यात येणार आहे. हे इंजिन 7,100 rpm वर 47hp ची पॉवर आणि 4,000rpm वर 52Nm टॉर्क जेनरेट करते. यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि स्लिपर क्लचही असणार आहे.

तसेच 25.5 किलोमीटर प्रतिलीटर मायलेजबाबत बोलायचे झाल्यास याचा वर्ल्ड मोटरसाइकल टेस्ट सायकल (WMTC) मध्ये समावेश करण्यात येईल. डब्ल्यूएमटीसी ही बाइक्सचा मायलेज मोजण्याची एक पद्धती आहे. 

टॅग्स :व्यवसायबाईक