Join us

जोखीम पत्करा अन् चांगले पैसे कमवा; गुंतवणूकदारांसाठी एमएनसी फंड हा उत्तम पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 10:31 IST

बहुराष्ट्रीय कंपन्यांत व्यवस्थापन मजबूत आणि तंत्रज्ञान अत्याधुनिक असते

नवी दिल्ली - जोखीम पत्करण्याची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांसाठी एमएनसी फंड हा उत्तम पर्याय आहे. एमएनसी फंड हे ५० टक्क्यांपेक्षा अधिक विदेशी प्रवर्तकांची हिस्सेदारी असलेल्या कंपन्यांत गुंतवणूक करतात. यात परतावा चांगला मिळतो. 

कमी असते अस्थिरताफंड्स इंडियाचे उपाध्यक्ष अरुणकुमार यांनी सांगितले की, एमएनसी फंड मान्यताप्राप्त जागतिक कंपन्यांत गुंतवणूक करतात.या कंपन्यांकडे मान्यताप्राप्त ब्रँड असतात. कर्ज कमी असते. बाजारातील चढ-उतारातही त्यांची कामगिरी चांगली असते. या फंडांमध्ये अस्थिरता कमी असते.

यामुळे चांगलेबहुराष्ट्रीय कंपन्यांत व्यवस्थापन मजबूत आणि तंत्रज्ञान अत्याधुनिक असते. मजबूत ताळेबंद आणि जागतिक ब्रँडमुळे परतावा चांगला मिळतो. जागतिक अनुभवामुळे अस्थिर काळात उत्तम कामगिरी करून कमी तोटा देतात.

या आहेत उणिवाभारतीय बाजारात समभाग सूचीबद्ध करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या कमी आहेत. गुंतवणुकीच्या संधी व ठिकाणे फंड व्यवस्थापकांकडे कमी असतात. गुंतवणूक तज्ज्ञ नव्या गुंतवणूकदारांना थिमॅटिक अथवा सेक्टोरल फंडांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. कारण यात जोखीम अधिक असते.

टॅग्स :गुंतवणूक