Join us  

पहिल्याच दिवशी ₹३०० पार पोहोचला 'हा' शेअर; IPO मध्ये ₹१०६ होती किंमत, जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 12:28 PM

या शेअरनं शेअर बाजारात आज जोरदार एन्ट्री केली आहे. कंपनीचे शेअर्स आज 173.58 टक्के नफ्यासह शेअर बाजारात लिस्ट झाले.

टॅक इन्फोसेकनं (TAC Infosec) शेअर बाजारात आज जोरदार एन्ट्री केली आहे. TAC Infosec चे शेअर्स 173.58 टक्के नफ्यासह 290 रुपयांवर बाजारात लिस्ट झाले. आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना कंपनीचे शेअर्स 106 रुपयांना मिळाले. म्हणजेच, लिस्टिंगच्या दिवशी, गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 184 रुपयांचा मोठा नफा झाला. दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी टॅक इन्फोसेकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. विजय केडिया यांचा कंपनीत 15% हिस्सा आहे. टॅक इन्फोसेकचा IPO 27 मार्च ते 2 एप्रिल 2024 पर्यंत खुला होता. 

लिस्टिंगनंतर अपर सर्किट 

लिस्टिंगनंतर लगेच टॅक इन्फोसेकच्या शेअर्सवर अपर सर्किट लागलं. कंपनीचे शेअर्स 5 टक्के अपर सर्किटसह 304.50 रुपयांवर पोहोचले. कंपनीच्या शेअर्सने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना श्रीमंत केलंय. टॅक इन्फोसेकच्या आयपीओची एकूण साईज 29.99 कोटी रुपये होता.  

तृशनीत अरोरा आणि चरणजीत सिंग हे कंपनीचे प्रवर्तक आहेत. तृशनीत हे कंपनीचे सीईओ आणि संस्थापक आहेत, त्यांच्याकडे कंपनीत 74% हिस्सा आहे. त्याच वेळी, सुप्रसिद्ध गुंतवणूकदार विजय केडिया यांची कंपनीमध्ये 15% भागीदारी आहे. याशिवाय अंकित विजय केडिया यांची कंपनीत 5%, चरणजीत सिंग यांची 4% आणि सुबिंदर जीत सिंग खुराना यांची 2% भागीदारी आहे. 

422 पट सबस्क्राईब 

कंपनीचा IPO एकूण 422.03 पट सबस्क्राइब झाला. किरकोळ गुंतवणूकदार श्रेणीत आयपीओ 433.80 पट सबस्क्राईब झाला होता. नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा  (NII) कोटा 768.89 पट, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा कोटा (QIB) 141.29 पट सबस्क्राइब झाला होता. आयपीओच्या एका लॉटमध्ये 1200 शेअर्स होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना यात 127200 रुपये गुंतवावे लागले. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार