Join us

खुशखबर! Swiggy कडून अनलिमिटेड फ्री डिलिव्हरीची घोषणा, फक्त करावे लागेल 'हे' काम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 16:25 IST

Swiggy : स्विगीच्या निवेदनात म्हटले आहे की, 'या प्रोग्रॅमशी संबंधित सदस्यांना 10 किमीच्या परिसरातील सर्व रेस्टॉरंटमधून किमान 149 रुपयांच्या ऑर्डरची मोफत अनलिमिटेड डिलिव्हरी मिळेल.'

नवी दिल्ली : तुम्हीही सतत स्विगीवरून (Swiggy)  खाद्यपदार्थ ऑर्डर करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. ऑनलाइन खाद्यपदार्थांची ऑर्डर आणि डिलिव्हरीची सुविधा देणाऱ्या स्विगी या प्लॅटफॉर्मने आपल्या मेंबरशिप प्रोग्रॅमशी संबंधित ग्राहकांसाठी अधिक सुविधा देऊ केल्या आहेत.

स्विगीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'या प्रोग्रॅमशी संबंधित सदस्यांना 10 किमीच्या परिसरातील सर्व रेस्टॉरंटमधून किमान 149 रुपयांच्या ऑर्डरची मोफत अनलिमिटेड डिलिव्हरी मिळेल.' याचबरोबर, कंपनीने म्हटले आहे की, स्विगी इंस्टामार्टवरील (Swiggy Instamart) मेंबर विशेष ऑफर अंतर्गत हजाराहून अधिक प्रोडक्टवर अधिक पैसे वाचवू शकतात.

तीन महिन्यांसाठी 299 रुपये द्यावे लागतीलयामध्ये फळे, भाज्या, किड्स प्रोडक्ट, पर्सनल केअर, घरगुती वापरासाठी लागणारे आणि इतर प्रोडक्टसह दररोज वापरल्या जाणार्‍या प्रोडक्ट्सचा समावेश आहे. स्विगीच्या माहितीनुसार, या प्रोग्रॅममध्ये सामील होण्यासाठी ग्राहकांना 12 महिन्यांसाठी 899 रुपये आणि तीन महिन्यांसाठी 299 रुपये द्यावे लागतील.

49 रुपयांत घेऊ शकता सबस्क्रिप्शनस्विगीकडून सांगण्यात आले की, कंपनी 15 ते 30 दिवसांसाठी 49 रुपयांच्या निवडक सबस्क्रिप्शनसाठी 'स्विगी वन ट्रायल' ऑफर करत आहे. याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना 'स्विगी वन मेंबरश‍िप' (Swiggy One Membership) घ्यावी लागेल.

टॅग्स :स्विगीव्यवसायअन्न