Join us  

गुड न्यूज! यंदा मिळणार भरघोस पगारवाढ; कर्मचाऱ्यांना किती फायदा होणार? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 2:16 PM

कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अवघे जग ठप्प झालेले असताना अनेक उद्योग, रोजगार संकटात आले. हजारोंच्या संख्येने नोकऱ्या गेल्या. मात्र, कोरोना संकटातून हळूहळू जग सावरत असताना कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एका कंपनीने केलेल्या सर्व्हेतून यंदाच्या वर्षी ९२ टक्के कंपन्या कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ देण्याच्या तयारी आहे, ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देउद्योग वाढीच्या विश्वासामुळे पगारवाढ करणार९२ टक्के कंपन्यांनी पगारवाढ करण्याच्या तयारीतडेलॉयटने केलेल्या सर्व्हेचे निरीक्षण

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अवघे जग ठप्प झालेले असताना अनेक उद्योग, रोजगार संकटात आले. हजारोंच्या संख्येने नोकऱ्या गेल्या. मात्र, कोरोना संकटातून हळूहळू जग सावरत असताना कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एका कंपनीने केलेल्या सर्व्हेतून यंदाच्या वर्षी ९२ टक्के कंपन्या कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ देण्याच्या तयारी आहे, ही बाब समोर आली आहे. (survey findings that over 92 percent of companies plan to give hike this year)  

डेलॉयटकडून करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये ही बाब समोर आली आहे. गतवर्षी केवळ ६० टक्के कंपन्यांनी पगारवाढ करणार असल्याचे सांगितले होते. तर, यावर्षी तब्बल ९२ टक्के कंपन्यांनी पगारवाढ करणार असल्याचे सांगितले आहे, असे या सर्व्हेत म्हटले आहे. 

कोरोना संकटामुळे बहुतांश कंपन्यांनी सन २०२० मध्ये पगारवाढ केली नव्हती. याउलट कर्मचारी कपात केली होती. मात्र, आता कोरोना संकटातून हळूहळू जग सावरत असताना उद्योग, कामधंदा मार्गी लागताना दिसत आहे. खरेदी, विक्री यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी बोनस आणि पगारवाढ करण्याची योजना कंपन्यांनी आखली आहे, असेही या सर्व्हेत म्हटले आहे. 

चीनमधून प्रकल्प हटवणार!; अॅपलचा आयपॅड आता भारतात तयार होणार

किती होणार पगारवाढ? 

डेलॉयटकडून करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार, यंदाच्या वर्षी ७.३ टक्के पगारवाढ होऊ शकते. सन २०१९ मध्ये कंपन्यांनी केलेली पगारवाढ ८.६ टक्क्यांच्या घरात होती. कोरोना संकटामुळे सन २०२० मधील पगारवाढ ४.४ टक्क्यांवर आली. आता मात्र, त्यात वाढ होऊ शकते, असे सर्व्हेत नमूद करण्यात आले आहे. 

कंपन्यांनी वाढवले बजेट

यंदाच्या वर्षी आर्थिक उलाढाल गतिमान होण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे वेतन वाढ करण्यासाठी कंपन्यांनी आपले बजेट वाढवले आहे. २० टक्के कंपन्यांनी दोन आकडी पगारवाढ देण्याची तयारी दर्शवली आहे. हाच आकडा गतवर्षी १२ टक्के होता. गेल्या वर्षी ज्या कंपन्यांनी पगारवाढ केली नाही, त्यापैकी एक तृतीयांश कंपन्यांनी या वर्षी चांगली पगारवाढ करत कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी तयारी केली जात आहे, असे या सर्व्हेत म्हटले आहे. 

कोणत्या क्षेत्रात भरघोस पगारवाढ होईल?

डेलॉयटने केलेल्या सर्व्हेत, जीवन विज्ञान आणि आयटी सेक्टर क्षेत्रात सर्वाधिक पगारवाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच उत्पादन आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पगारवाढ होईल, असा दावा केला जात आहे. डिजिटल आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्या सरासरीपेक्षा अधिक पगारवाढ करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :व्यवसायमाहिती तंत्रज्ञान