Join us  

पोस्टाच्या अशाही योजना ज्या 8.7 टक्क्यांएवढे व्याज देतात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 4:38 PM

भारतीय पोस्ट खाते अन्य सेवांबरोबरच 9 प्रकारच्या सेव्हिंग स्कीम पुरविते. 

जर तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय तुमच्या कष्टाच्या पैशांवर उत्पन्न मिळवू पाहत असाल तर पोस्टाच्या या योजना फायद्याच्या आहेत. पोस्टाच्या बचत योजनांमध्ये 8.7 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. भारतीय पोस्ट खाते अन्य सेवांबरोबरच 9 प्रकारच्या सेव्हिंग स्कीम पुरविते. 

यामध्ये सेव्हिंग्‍स अकाउंट, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, रिकरिंग डिपॉझिट, नॅशनल सेव्हिंग टाईम डिपॉझिट, नॅशनल सेव्हिंग मंथली इनकम अकाउंट, सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, पब्लिक प्रोव्हिडेंट फंड, किसान विकास पत्र अकाउंट आणि सुकन्या समृद्धीसारख्या योजनांमध्ये पैसे गुंतविले जाऊ शकतात. यापैकी पीपीएफ, सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आणि सुकन्या समृद्धी योजनांमध्ये 8 टक्के प्रती वर्ष व्याज दिले जाते. 

पीपीएफ : सेव्हिंगसाठी कमीतकमी 500 आणि जास्तीतजास्त 1.5 लाख रुपये प्रति वर्ष जमा करता येतात. या सेव्हिंग स्कीममध्ये 8 टक्के व्याजदर दिला जातो. तसेच या रक्कमेवर आयकरापासून सूटही मिळते. तसेच व्याजही करमुक्त असते. या योजनेमध्ये तिसऱ्या वर्षी कर्ज घेतले जाऊ शकते. तसेच ही योजना 15 वर्षांच्या मुदतीची असते जी एक वर्ष वाढविता येते. 

सुकन्या समृद्धी या योजनेसाठी कमीतकमी 1000 आणि जास्तीतजास्त 1.5 लाख रुपये 100 च्या पटींमध्ये दरवर्षी जमा करावे लागतात. या योजनेत 8.5 टक्के व्याज मिळते. जर एखाद्या वर्षी पैसे जमा न केल्यास हे खाते रद्द केले जाते. तसेच वर्षाला 50 रुपयांचा दंड आकारला जातो. हे खाते मुलीच्या जन्मदिनापासून 10 वर्षाच्या वयापर्यंत कधीही काढले जाऊ शकते. 

 

ज्येष्ठ नागरिक बचत योजना या खात्यामध्ये एकावेळी 1000 रुपयांच्या पटीमध्ये जास्तीतजास्त 15 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. या बचत खात्यात 8.7 टक्के दर वर्षी व्याजदर दिला जातो. या खात्यात जमा करण्यासाठी रोख रक्कम 1 लाखांपेक्षा कमी आणि जास्त असल्यास चेकस्वरुपात स्वीकारली जाते. हे खाते जर 1 वर्षाच्या आत बंद केल्यास 1.5 टक्के रक्कम कापली जाते. 2 वर्षांच्या आत बंद केल्यास 1 टक्के रक्कम कापली जाते. या योजनेची मुदत 5 वर्षांची असते. 

टॅग्स :पोस्ट ऑफिस