Join us  

आता टॅक्स वाचवण्यासाठी खोटे बिल देणे पडेल महागात, होईल एवढा दंड 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 6:39 PM

टॅक्स वाचवण्यासाठी खोटी बिले देण्याचा मार्ग आपल्यापैकी अनेकजण सर्रासपणे वापरतात. रिएम्बर्समेंट क्लेम करण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांकडून खोटी बिले सादर केली जातात. जर तुम्हीही असे करत असाल तर सावधान. खोटी बिले सादर केल्यास...

नवी दिल्ली - टॅक्स वाचवण्यासाठी खोटी बिले देण्याचा मार्ग आपल्यापैकी अनेकजण सर्रासपणे वापरतात. त्यात आर्थिक वर्ष संपत आले की कंपनीच्या एचआर विभागाकडून  रिअम्बर्समेंट क्लेम करण्यासाठी मेल येऊ लागतात. त्यासाठी आवश्यक त्या बिलांची पूर्तत करण्यास सांगितले जाते. मग रिएम्बर्समेंट क्लेम करण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांकडून खोटी बिले सादर केली जातात. जर तुम्हीही असे करत असाल तर सावधान. खोटी बिले सादर केल्यास प्राप्तिकर विभागाचा ससेमिरा तुमच्या मागे लागू शकतो. अनेक कर्मचाऱ्यांना नियमित पगारासोबत अनेक लाभ आणि रिएम्बर्समेंट दिले जातात. हे लाभ ठरावीक मर्यादेपर्यंत करमुक्त असतात. त्यामध्ये वैद्यकीय बील, प्रवास भत्ता, घरभाडे भत्ता, लिव्ह ट्रॅव्हल्स अलाऊन्स हे रिएम्बर्समेंट आणि अकाऊंटमध्येच येतात. त्याबरोबरच 15 हजारापर्यंतच्या वैद्यकीय बिलावरसुद्धा प्राप्तिकरामधून सूट मिळत असते. खोटी बिले सादक केल्यास अशाप्रकारे पकडले जाऊ शकताआर्थिक क्षेत्रातील जाणकार सांगतात की खोटी बिले सादर केल्यास तीन कारणांमुळे तुम्ही प्राप्तिकर खात्याच्या जाळ्यात सापडू शकता. ती तीन कारणे पुढीलप्रामाणे आहेत. 1 -  जर कुठल्याही कारणाने प्राप्तिकर विभागाने त्या व्यक्तीचा आयटीआर फॉर्म स्क्रूटनीसाठी उचलला आणि त्यासाठी आवश्यक पुरावे ती व्यक्ती देऊ शकली नाही तर अडचण होऊ शकते. 2 - जर एखाद्या कर्मचाऱ्याकडे टीडीएस आणि बिलासंदर्भातील पुरावे मागण्यात आले आणि त्यामाधील माहितीमध्ये तफावत आढळली तर तुम्हाला अटक होऊ शकते.3 - जर कुणी तुम्ही केलेल्या हेराफेरीविषयी प्राप्तिकर विभागास माहिती दिली तर तुम्हाला अटक होणे निश्चित असते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बँका आणि प्राप्तिकर विभागाची नजर  प्रत्येक व्यक्तीवर असते. त्यामुळे तुमच्या कुठल्याही मोठ्या व्यवहाराची माहिती ही बँकाचा प्राप्तिकर विभागाला पुरवत असतात. जाणकारांच्या म्हणण्यानुसार वार्षिक 10 लाखांहून अधिकची उलाढाल करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाची नजर असते. तसेच पॅनकार्डच्या लिमिटमुळे मर्यादेपेक्षा जास्तीचे व्यवहारची नजरेत येत असतात.  खोटे बिल सादर होऊ शकतो एवढा दंड  जर कुठलाही कर्मचारी खोटी बिले सादर केल्याप्रकरणी दोषी आढळला. तर त्याच्यावर 50 टक्क्यांपासून 200 टक्क्यांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. हा दंड कलम 234ए, 234बी आणि 234सी अन्वये आकारण्यात येतो. काही प्रकरणांमध्ये क्लेम हा योग्य असतो, पण व्यवहार रोखीमध्ये झालेला असतो. त्यामुळे तो सिद्ध करणे कठीण बनते. त्यामुळे पावत्या सांभाळून ठेवण्याचा सल्ला दिला जातो.  

टॅग्स :करइन्कम टॅक्सगुन्हा