Join us  

Stock Market Update: शेअर बाजाराची विक्रमी वाटचाल! सेंसेक्स 56,000 च्या पार, 'या' शेअर्सनी केलं मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 5:14 PM

ग्लोबल मार्केटमधून चांगले  संकेत मिळाल्यानंतर, आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह उघडला.

भारतीय शेअर बाजारात सलग 4 सेशनपासून वाढ दिसत आहे. आज सकाळी बाजार हिरव्या निशाणावर ओपन झाला आणि दिवसभराच्या व्यवहारानंतर हिरव्या निशाणावरच बंद झाला. आजच्या व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजाराचा सूचकांक सेन्सेक्स 371.69 अंक अथवा 0.67 टक्क्यांच्या वाढीसह 56,053.64 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 105.60 अंकांच्या किंवा 0.64% च्या वाढीसह 16,710.85 अंकांवर बंद झाला.

सकाळच्यासुमारास अशी होती बाजाराची स्थिती - ग्लोबल मार्केटमधून चांगले  संकेत मिळाल्यानंतर, आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह उघडला. सुरुवातीला सेंसेक्‍स आणि न‍िफ्टी दोन्हीही हिरव्या न‍िशाणावर काम करताना दिसत होते. ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीला 30 अंकांचा सेंसेक्‍स 118.89 अंकांनी वाढून 55,800 अंकांवर ओपन झाला.  तसेच, 50 अंकांचा न‍िफ्टीही 62 अंकांनी वाढून 16,661.25 वर ओपन झाला. प्री-ओपन सेशनदरम्यान सेंसेक्‍सचे 30 पैकी 28 शेअर हिरव्या न‍िशाणावर होते.

जागतिक बाजारातील स्थिती - जागतिक बाजारासंदर्भात बोलायचे झाल्यास, तेथूनही चांगले संकेत मिळत आहेत. अमेरिकेच्या बाजारात तेजीची हॅट्रिक लागल्याने गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. डाओ जोन्स 150 पॉइंट्सने उसळी घेऊन बंद झाला. तसेच, Nasdaq मध्ये 1.4 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. ECB ने 11 वर्षांत पहिल्यांदाच व्याद दरात 0.5 टक्क्यांची वाढ केली आहे.

एलआयसीच्या शेअरची स्थिती -एलआयसीच्या शेअरमध्ये आज 22 जुलैला पुन्हा तेजी दिसून आली आहे. आज LIC चा शेअर 0.45 अंक म्हणजेच 0.065 टक्क्यांच्या घसरणीसह 688.00 वर ट्रेड करत आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांकनिफ्टी