Join us

Stock Market : छोट्या समभागांनी केली वर्षभरात अधिक कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 06:09 IST

Stock Market: भांडवल बाजाराची वाटचाल बघताना मुख्यत: सेन्सेक्स आणि निफ्टीचा विचार केला जातो; मात्र बाजारात असलेल्या छोट्या कंपन्यांनी (स्मॉलकॅप) या दोन्ही प्रमुख निर्देशांकांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. मिडकॅप समभागांनीही चांगल्या कामगिरीची नोंद केलेली आहे. 

- प्रसाद गो. जोशीभांडवल बाजाराची वाटचाल बघताना मुख्यत: सेन्सेक्स आणि निफ्टीचा विचार केला जातो; मात्र बाजारात असलेल्या छोट्या कंपन्यांनी (स्मॉलकॅप) या दोन्ही प्रमुख निर्देशांकांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. मिडकॅप समभागांनीही चांगल्या कामगिरीची नोंद केलेली आहे. गत आर्थिक वर्षामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीने  १८ टक्के वाढ दिली आहे. मात्र बीएसई स्मॉलकॅप या निर्देशांकाने या वर्षामध्ये ७५६६.३२ अंशांची म्हणजेच ३६.६४ टक्क्यांनी वाढ दिली आहे. बीएसई मिडकॅप या निर्देशांकानेही चांगल्या कामगिरीची नोंद केली आहे. हा निर्देशांक १९.४५ टक्के म्हणजे ३९२६.६६ अंशांनी वाढला. या दोन्ही निर्देशांकांतील कंपन्यांमध्ये अधिक जोखीम असली तरी परतावाही अधिक मिळालेला आहे.  गतसप्ताहात बाजार तेजीमध्ये होता. युद्धामध्ये समेट होण्याची निर्माण झालेली शक्यता आणि परकीय वित्तसंस्थांनी केलेली थोडी खरेदी यांमुळे बाजार वर गेला. या सप्ताहात बाजाराचे एकूण भांडवल मूल्य ७,५०,६५६.१५ कोटी रुपयांनी वाढले आहे.

सहाव्या महिन्यात परकीय वित्तसंस्थांकडून विक्रीमार्च महिन्यामध्येही परकीय वित्तसंस्थांकडून भारतीय भांडवल बाजारात विक्री केली गेली आहे. सलग सहाव्या महिन्यात या कंपन्यांची विक्री कायम आहे. मार्चमध्ये या संस्थांनी ४१,१२३ कोटी रुपये काढून घेतले आहेत. खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि महागाईमधील वाढ यांमुळे भारतीय बाजारातून कमी परतावा मिळण्याच्या शक्यतेने ही विक्री होत आहे. 

आगामी सप्ताहात बाजाराची वाटचाल संमिश्र राहण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन दरम्यानचे युद्ध, खनिज तेलाच्या किमती, परकीय वित्तसंस्थांची कामगिरी, भारतीय अर्थव्यवस्थेतील पीएमआयची आकडेवारी आणि पतधोरण समितीचे निर्णय यांकडे बाजाराचे लक्ष लागून राहिले आहे.

गतसप्ताहातील स्थितीनिर्देशांक    बंद मूल्य    फरकसेन्सेक्स    ५९,२७६.६९    १९१४.४९निफ्टी    १७,६७०.४५    ५१७ .४५मिडकॅप    २४,४४३.५९    ६५३.६८स्मॉलकॅप    २८,६९९.४०    ८९८.८०

टॅग्स :शेअर बाजारव्यवसाय