Join us  

शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १२००, तर निफ्टी ४०० अंकांनी कोसळला; ५.२८ लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 1:27 PM

जागतिक बाजारातील थंड वातावरणाचा परिणाम आज मुंबई स्टॉक एक्चेंजवरही पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजाराची सुरुवात निराशाजनक झाली.

मुंबई-

जागतिक बाजारातील थंड वातावरणाचा परिणाम आज मुंबई स्टॉक एक्चेंजवरही पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजाराची सुरुवात निराशाजनक झाली. सेन्सेक्स आज दुपारी साडेबारा वाजता १२०० अंकांनी कोसळून ५७,८५५.७६ वर आला आहे. तर निफ्टी ४०० अकांनी कोसळून १७,२६१ च्या स्तरावर खाली आला आहे. 

आयटी, मेटल, ऑटो, फार्मा आणि रिआलिटीसह सर्वच सेक्टरवर बाजाराचा दबाव असल्याचं पाहायला मिळत आहे. बाजारातील मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. जवळपास ५.२८ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. आजच्या कारभारात जवळपास सर्वच सेक्टोरल इंडेक्ट लाल निशाणात ट्रेंड करत आहेत. सर्वात मोठी घसरण आयटी, मेटल, रिआलिटी आणि ऑटो इंडेक्समध्ये पाहायला मिळत आहे. या क्षेत्रांमध्ये २ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदविण्यात आली आहे. 

आज बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये सर्वात जास्त घट बजाज फायनान्समध्ये ३.७५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. याशिवाय विप्रो, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, इन्फोसिस, एचसीएल टेक, कोटक महिंद्रा बँक यांच्याही शेअर्समध्ये घसरण नोंदविण्यात आली आहे. दुसरीकडे सन फार्मा, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसीचा भाव वधारल्याचं पाहायला मिळालं आहे. 

पाच दिवसात गुंतवणुकदारांचे १५ लाख कोटी बुडालेसलग पाच व्यापार सत्रात बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली असून गुंतवणुकदारांना मोठा झटका बसला आहे. गुंतवणुकदारांचे तब्बल १५ लाख कोटी रुपयांचे बुडाले आहेत. एकट्या सोमवारीच गुंतवणुकदारांचे ५.३० लाख कोटी बुडाले आहेत. शुक्रवारी बीएसई लिस्टेड कंपन्यांचा एकूण मार्केट कॅप २,६९,६५,८०१.५४ कोटी रुपये इतका होता. तो आज ५,३१,५७६.०५ कोटी रुपयांची घट होऊन २,६४,३४,२२५.४९ कोटी रुपये झाला आहे. 

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांकव्यवसाय