मुंबई : दिवसाची सुरुवात वाढीने झाल्यानंतर उत्तरार्धात मोठ्या प्रमाणावर विक्रीचे दडपण आल्यामुळे मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात घसरण झालेली दिसून आली. या विक्रीमुळे बाजाराला आपली वाढ राखता आली नाही.मुंबई शेअर बाजारात नवीन सप्ताहाचा प्रारंभ वाढीने झाला. मात्र दुपारच्या सत्रात बँका आणि वित्तीय कंपन्यांच्या समभागांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याने बाजारावर दडपण आले. परिणामी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशिल निर्देशांक ९७.९२ अंश म्हणजेच ०.२५ टक्क्यांनी खाली येऊन ३८,७५६.६३ अंशांवर बंद झाला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २४.४० अंशांनी घसरला. दिवसअखेर तो ११,४४०.०५ अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये मात्र वाढ झालेली दिसून आली. हे दोन्ही निर्देशांक सुमारे ४ टक्क्यांनी वाढले आहेत.जागतिक शेअर बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण होते. कोरोनावर लवकरच लस सापडण्याची बाजाराला अपेक्षा असून, त्यावरच तो वाढत आहे.
विक्रीच्या मोठ्या दडपणाने शेअर बाजार घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 02:37 IST