Join us  

Stock Market Crash: शेअर बाजारात हाहाकार, सेंसेक्‍स 1400 अंकांनी कोसळला; न‍िफ्टी धडाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 5:17 PM

Stock Market Updates: ट्रेडिंग दरम्यान सेन्सेक्स 52,669.51 इतक्या लो लेव्हलपर्यंत घसला. तर निफ्टीने 15,775.20 अंकाच्या पातळीला स्पर्ष केला.

जगभरातील शेअर बाजारात होत असलेल्या घसरणीचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावरही बघायला मिळाला. भारतीय शेअर बाजारात आज दिवसभर विक्रीचेच वातावरण होते आणि सेंसेक्‍स व न‍िफ्टी सलग दुसऱ्या दिवशीही घसरणीसह बंद झाला. ट्रेडिंग दरम्यान सेन्सेक्स 52,669.51 इतक्या लो लेव्हलपर्यंत घसला. तर निफ्टीने 15,775.20 अंकाच्या पातळीला स्पर्ष केला.

न‍िफ्टीमध्ये 400 अंकांपेक्षाही अधिकची घसरण -ट्रेडिंग सत्राच्या शेवटी 30 अंकांचा सेन्सेक्‍स 1416.30 अंकांनी घसरून 52,792.23 वर आला. तर 50 अंकांचा न‍िफ्टी 430.90 च्या घसरणीसह 15,809.40 अंकांवर बंद झाला. न‍िफ्टीच्या टॉप लूजर्समध्ये व‍िप्रो, एचसीएल टेक्‍नॉलॉजी, टेक मह‍िंद्रा, टीसीएस आणि इंफोस‍िस यांचा समावेश आहे. तर टॉप गेनर्सच्या यादीत केवळ आयटीसी, डॉ. रेड्डी आणि पावरग्र‍िडच्या शेअर्सचा समावेश आहे. आयटीसीचे त‍िमाही पर‍िणाम आल्यानंतर शेअर्समध्ये सुमारे साडेसात टक्क्यांची उसळी दिसून आली होती.

सेंसेक्‍सच्या 3 शेअर्समध्ये तेजी -आज व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्समधील आयटीसी, डॉ रेड्डीज आणि पॉवरग्रीडचे शेअर्स वगळता इतर सर्व शेअर्समध्ये घसरण दिसून आली. आज दिवसभराच्या व्यवहारादरम्यान मेटल, आयटी, फार्मा, रियल्टी, ऑटो आणि बँकेच्या शेअर्समध्ये मोठा दबाव दिसून आला. यापूर्वी शेअरबाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली होती. तत्पूर्वी, आज सकाळी ओपनिंगवेळी सेंसेक्‍स 53307.88  होता, तर न‍िफ्टी 15971.40 अंकांवर होती.  

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारबाजारनिर्देशांकनिफ्टी