Join us  

सेन्सेक्स 486 अंकांनी वधारला; एकूण मार्केट कॅप 404 लाख कोटींच्या उच्चांकावर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 4:32 PM

आजच्या सत्रात बँकिंग, फार्मा आणि आयटीसह बहुतांश शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली.

Stock Market Closing On 25 April 2024: सलग पाचव्या दिवशी(दि.25) शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 486 अंकांनी वाढून 74,340 वर आणि निफ्टी 168 अंकांनी वाढून 22,570 वर बंद झाला. याआधी बुधवारी सेन्सेक्स 114 अंकांनी वाढून 73,852 वर बंद झाला होता. दुपारच्या सत्रात अचानक वाढलेल्या खरेदीमुळे शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली.

आजच्या सत्रात बँकिंग, फार्मा आणि आयटीसह बहुतांश शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. या प्रचंड वाढीमुळे शेअर बाजाराच्या मार्केट कॅपने ऐतिहासिक उच्चांक गाठला. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 404.09 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे मागील सत्रात 401.47 लाख कोटी रुपयांवर होते. म्हणजेच, आज मार्केट कॅपमध्ये 2.62 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, ऑटो, मेटल्स, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, ऑइल अँड गॅस, हेल्थकेअर यांसारख्या क्षेत्रांतील शेअर्स वाढले, तर रिअल इस्टेट आणि ग्राहकोपयोगी वस्तूंचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 23 शेअर्स वाढीसह आणि 7 शेअर्स तोट्यासह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 39 शेअर्स वाढीसह आणि 11 तोट्यासह बंद झाले.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

 

 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक