Join us

Stock Market : शेअर बाजाराच्या नियमांमध्ये मोठा बदल, पैसे लावणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाच्या अपडेट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 10:20 IST

Stock Market : सेबीच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सेबीकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये एफपीआयच्या नोंदणीशी संबंधित अटींच्या बदलांना मान्यता देण्यात आली. 

मार्केट रेग्युलेटरी सेबीकडून शेअर बाजाराशी संबंधित नियमाममध्ये वेळोवेळी बदल केला जातो. आता सेबीने कारभारातील सुलभता वाढवण्यासाठी परदेशी पोर्टफोलियो गुंतवणुकदारांच्या नोंदणीमध्ये लागणारा वेळ कमी करण्यासाठी बोलणी केली आहे. सेबीच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सेबीकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये एफपीआयच्या नोंदणीशी संबंधित अटींच्या बदलांना मान्यता देण्यात आली. 

या बदलांनंतर परकीय गुंतवणूकदारांना नोंदणीची मान्यता देण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल. नोंदणीशी संबंधित कागदपत्रांवर डिजिटल स्वाक्षऱ्यासुद्धा केल्या पाहिजेत. अर्जांच्या स्कॅन प्रतींच्या आधारावर सेबी एफपीआयला मान्यता देईल. त्याशिवाय सेबीच्या संचालक मंडळाने आपल्या आरई द्वारे क्लाऊड सर्व्हिस स्वीकारण्याबाबत संबंधित प्रारूपालाही स्वीकृती दिली होती.

याशिवाय सेबीच्या संचालक मंडळाने कंपन्यांकडून शेअर बाजाराशिवाय सेबीच्या संचालक मंडळाने कंपन्यांकडून शेअर बाजाराच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या शेअरच्या पुनर्खरेदीच्या सिस्टिमला हळूहळू संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच यांनी सांगितले की, शेअर बाजाराकडून शेअर पुवर्खरेदीच्या पद्धतीने पक्षपाताची शंका विचारात घेऊन आता निविदा प्रस्तावाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितले की, हा हळूहळू पुढे जाणारा रस्ता आहे. शेअर्सच्या पुनर्खरेदीच्या सध्याच्या पद्धतीला हळूहलू संपुष्टात आणले जाईल.  

टॅग्स :शेअर बाजारव्यवसाय