Join us

State Bank Of India : SBI अकाउंट होल्‍डर्सची बल्‍ले-बल्‍ले, सर्वात मोठ्या बँकेनं दिलं 'हे' खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 17:47 IST

SBI च्या म्हणण्यानुसार, 2-3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याजदर 10 बेस पॉईंट्सनी वाढवून 5.20 टक्के, तीन ते पाच वर्षांपेक्षा कमीच्या FD वर 15 बेस पॉईंट्सनी वाढवून 5.45 टक्के करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) फिक्स्ड डिपॉजिटचे दर (SBI FD rate) वाढविले ​​आहेत. हे नवे दर 10 मार्चपासून लागू झाले आहेत. SBI ने 2 कोटी रुपयांहून अधिकच्या ठेवी असलेल्या फिक्स्ड डिपॉजिटवर 20-50 बेस पॉइंट्सपर्यंतची वाढ केली आहे. 

एसबीआयनं व्याजदर वाढवले -या बदलानंतर, 2 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या एफडीवर (ज्यांचा कालावधी 211 दिवसांपासून एक वर्षांपेक्षा कमी असेल) व्याजदर (FD Interest Rate) 20 बेसिस पॉइंट्सनी वाढविण्यात आला आहे. अशा एफडीवर 10 मार्च, 2022 पासून 3.30 परसेंट व्याज मिळेल. यापूर्वी हा दर 3.10 टक्के होता. वरिष्ठ नागरिकांना अशा एफडीवर आधी 3.60 टक्के व्याज मिळत होते. हे वाढून आता 3.80 टक्के एवढे झाले आहे.

इतर दरही वाढवले - भारतीय स्टेट बँकेने या व्यतिरिक्तच्या फिक्स्ड डिपॉजिटचे दरही वाढवले आहेत. या अंतर्गत, एक वर्षापासून 10 वर्षांपर्यंतच्या एफडी दरात 50 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. म्हणजेच, पूर्वी ज्या एफडीवर 3.10 टक्के व्याज मिळायचे, त्यावर आता 3.60 टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवरील व्याज 3.60 टक्क्यांवरून 4.10 टक्के करण्यात आले आहे. 

2 कोटींपेक्षा कमी रक्कमेवरील FD रेट -SBI च्या म्हणण्यानुसार, 2-3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याजदर 10 बेस पॉईंट्सनी वाढवून 5.20 टक्के, तीन ते पाच वर्षांपेक्षा कमीच्या FD वर 15 बेस पॉईंट्सनी वाढवून 5.45 टक्के करण्यात आला आहे. तर 5-10 वर्षांपर्यंतच्या FD साठी, या वर्षी 15 फेब्रुवारीपासून व्याजदर 10 बेस पॉइंट्सनी वाढवून 5.50 टक्यांपर्यंत करण्यात आला आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना सर्व कालावधीसाठी सामान्य दरापेक्षा 0.50% अधिक मिळेल. 

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाएसबीआयगुंतवणूक