Join us  

अशा प्रकारच्या SMS, कॉलपासून सावधान! SBI ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना केले अलर्ट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 1:37 PM

state bank of india : बँकेने एक ट्विट जारी करून आपल्या कोट्यवधी ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देबनावट ई-मेल, एसएमएस, लिंक फसवणूक करणाऱ्यांकडून ग्राहकांना पाठविले जात असल्याचे बँकेने म्हटले आहे.

नवी दिल्ली : देशात बँकिंग फसवणूकीची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. सध्या घोटाळेबाज फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी देशातील सर्वात मोठी सरकारी बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया'ने (State Bank of India-SBI) आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे. याच पार्श्वभूमीवर बँकेने एक ट्विट जारी करून आपल्या कोट्यवधी ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अशी फसवणूक रोखण्याचा मार्ग सांगितला आहे.

SBI ने ट्विट करून दिली माहितीइंटरनेट बँकिंग सुविधा आणि डेबिट कार्ड सुविधा अॅक्टिव्ह करण्यासाठी ग्राहकांनी त्यांची वैयक्तिक माहिती, आधार क्रमांक आणि ई-केवायसी संबंधी माहिती कोणत्याही एसएमएस, अ‍ॅप किंवा मोबाइल क्रमांकावर शेअर करू नये, असे एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केले आहे. तसेच, एसबीआयने म्हटले आहे की, ग्राहकांनी बँकेशी संबंधित कोणत्याही सेवेची माहिती मिळवण्यासाठी हेल्पलाइन नंबर किंवा वेबसाइटचा वापर केला पाहिजे.

बनावट ई-मेल, एसएमएस, लिंक फसवणूक करणाऱ्यांकडून ग्राहकांना पाठविले जात असल्याचे बँकेने म्हटले आहे. अशा भ्रामक आणि बनावट मेसेजच्या जाळ्यात अडकू नका. अशी घटना घडल्यास ताबडतोब बँक व स्थानिक पोलिसांना कळवा.

टोल फ्री नंबरवर करा संपर्कएसबीआयने कस्टमर्स केअर नंबरही जारी केला आहे. कोणत्याही माहितीसाठी तुम्ही बँकेशी संबंधित कोणतीही माहिती कस्टमर्स केअर नंबर 1800-11-2211, 1800-425-3800 किंवा 080-26599990 वर संपर्क साधून मिळवू शकता.

(देशातील 'या' मोठ्या बँकांकडून स्वस्त घर खरेदी करण्याची संधी; शेवटचे सात दिवस शिल्लक!)

बँकिंग सेवेसाठी अधिकृत पोर्टलचा वापर कराएसबीआय ऑनलाइन बँकिंग सेवा वापरणारे ग्राहक बँकेच्या अधिकृत पोर्टलद्वारे बँकिंग सेवेचा लाभ घेऊ शकतात. कोणत्याही बँकिंग सेवेचा लाभ केवळ अधिकृत पोर्टलद्वारे घ्या, असे एसबीआयने सांगितले आहे. असे नाही केले तर तुम्ही बँकिंग फसवणूकीचा शिकार होऊ शकता.

(एप्रिलमध्ये फक्त 17 दिवस बँका उघडणार! मार्चच्या शेवटच्या आठवड्यातही आहेत सुट्ट्या; आताच बँकेची कामे उरकून घ्या...)

सायबर क्राइम पोर्टलवर कशी करावी तक्रार?या दुसर्‍या पर्यायाद्वारे तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला तुमचे नाव, लॉगिन आयडी, मोबाइल नंबर आणि ओटीपी टाकावा लागेल. जर तुम्ही नवीन युजर्स असल्यास तुम्हाला आधी या पोर्टलवर स्वतःला रजिस्टर करणे आवश्यक आहे. नवीन युजर्स म्हणून रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाइल क्रमांक द्यावा लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठविला जाईल. ओटीपी अपलोड केल्यानंतर सबमिट केल्यानंतर, रजिस्ट्रेशनचे काम पूर्ण होईल. यानंतर, तुम्ही तुमची तक्रार नोंदविण्यात सक्षम असाल. हे काम अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होईल. 

टॅग्स :एसबीआयस्टेट बँक आॅफ इंडियाबँकसायबर क्राइमऑनलाइन