नवी दिल्लीः पुढच्या आठवड्यात म्हणजे 1 ऑगस्टपासून देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली एसबीआय ऑनलाइन पैशांच्या व्यवहार सुविधांशी संबंधित शुल्क माफ करणार आहे. तसेच जीएसटी काऊंसिलनं घटवलेला कराचा दरही 1 ऑगस्टपासून लागू होणार आहे. 1 ऑगस्टपासून मालमत्तेसंबंधीचे सर्किल रेट कमी होणार आहे. तसेच नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये घर खरेदी करणं आता आणखी स्वस्त होणार आहे. नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये घराचं रजिस्ट्रेशन करताना 6 टक्के कमी शुल्क द्यावं लागणार आहे. ग्रुप हाऊसिंगमध्ये 6 टक्के आणि कमर्शियलमध्ये 25 टक्के सरचार्ज संपवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. तसेच घरगुती सिलिंडरची किंमतही निश्चित केली जाणार असून, याचा सरळ प्रभाव आपल्यावर पडणार आहे.SBIची ही सुविधा मोफत- स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI) ने आयएमपीएस चार्जेस संपवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑगस्ट 2019पासून आपल्याला स्टेट बँकेच्या ऑनलाइन व्यवहारावर आयएमपीएस शुल्क द्यावं लागणार नाही. SBIचं योनो अॅप, इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून पैसे हस्तांतरित करताना ग्राहकाकडून आता आयएमपीएस शुल्क वसूल केलं जाणार नाही.
खूशखबर! 1 ऑगस्टपासून SBIच्या 'या' सुविधा मिळणार मोफत, घर खरेदीसह गाडी घेणाऱ्यांना फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 09:15 IST