New Year With Investment : सरत्या वर्षाला निरोद देत तुम्ही देखील नव्या जोमाने नवीन वर्षाला सुरुवात केली असेल. या वर्षभरात करावयच्या असंख्य गोष्टी लिहून ठेवल्या असतील. अनेक लोक नवीन वर्षात आपल्या कुटुंबाच्या चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात. जर तुम्हीही नवीन वर्षात गुंतवणूक सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला अशाच काही सरकारी गुंतवणूक योजनांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला हमीसह निश्चित परतावा मिळेल.
पीपीएफपीपीएफ म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही सरकारी गुंतवणूक योजना आहे. या योजनेवर सध्या ७.१ टक्के व्याज दिले जात आहे. एका आर्थिक वर्षात किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १,५०,००० रुपये पीपीएफमध्ये जमा करता येतात. ही योजना १५ वर्षात परिपक्व होते. पण, तुम्ही ५-५ वाढवून जास्तीत जास्त ५० वर्षांपर्यंत वाढवता येते.
पोस्ट ऑफिस टीडीपोस्ट ऑफिस केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. बँक एफडीप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्ये टीडी (टाईम डिपॉझिट) योजना चालवली जाते. पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्षापासून ५ वर्षांपर्यंत टीडी मिळवण्याचा पर्याय आहे. TD वर ६.९ टक्के ते ७.५ टक्के व्याज आहे.
सुकन्या समृद्धी योजनासध्या १० वर्षांखालील मुलींसाठी उघडलेल्या या खात्यावर ८.२ टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत, एका आर्थिक वर्षात किमान २५० रुपये आणि कमाल १,५०,००० रुपये जमा करता येतात. ही योजना २१ वर्षात परिपक्व होते. जर मुलगी १८ वर्षांची झाली असेल आणि तुम्हाला तिचे लग्न करायचे असेल तर अशा परिस्थितीत खाते बंद केले जाऊ शकते.
किसान विकास पत्रकिसान विकास पत्र (KVP) योजनेवर सध्या ७.५ टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेअंतर्गत, किमान १००० रुपयांमध्ये खाते उघडता येते. जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. KVP अंतर्गत, तुम्ही गुंतवलेले पैसे थेट ११५ महिन्यांत (९ वर्षे आणि ७ महिने) दुप्पट होतात.