Join us
Daily Top 2Weekly Top 5

जगभरात निर्यातीसाठी विशेष संघटना, उत्पादन क्षेत्र एक ट्रिलियन करण्याचे लक्ष्य; केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांची माहिती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:19 IST

देशातील लघुउद्योगांमधील उत्पादनांना निर्यातीत स्थान मिळावे यासाठी केंद्र सरकार विशेष संघटना स्थापन करीत आहे. त्याआधारे उत्पादन क्षेत्र काही वर्षांत एक ट्रिलियन डॉलर (६५ लाख कोटी रुपये)पर्यंत नेले जाईल, अशी माहिती

मुंबई : देशातील लघुउद्योगांमधील उत्पादनांना निर्यातीत स्थान मिळावे यासाठी केंद्र सरकार विशेष संघटना स्थापन करीत आहे. त्याआधारे उत्पादन क्षेत्र काही वर्षांत एक ट्रिलियन डॉलर (६५ लाख कोटी रुपये)पर्यंत नेले जाईल, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.सीआयआयच्या राष्टÑीय उत्पादन परिषदेत सुरेश प्रभू यांनी उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहित करण्याच्या योजनांवर प्रकाश टाकला. लघू व मध्यम उद्योग कंपन्यांमध्ये निर्यातीची क्षमता आहे. त्यासाठी पूरक वातावरण तयार करून त्यांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार जागतिक स्तरावर संघटना उभी करेल.औद्योगिक विकास जिल्हानिहाय हवाऔद्योगिक विकासाचे परिमाण ठरवताना ते जिल्हानिहाय निश्चित व्हावे, असे मत परिषदेचे अध्यक्ष जमशेद गोदरेज यांनी व्यक्त केले. इज आॅफ डुइंग बिझनेसमध्ये भारताचा क्रमांक वाढला असला तरी प्रत्यक्ष जिल्हा आणि तालुुका स्तरापर्यंत किती उद्योग पोहोचले, याचा अभ्यास होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. उत्पादनांची निर्यात करू शकणाºया लघू व मध्यम श्रेणीतील १२० कंपन्या नक्की केल्या असून, ती संख्या लवकरच २ हजारांवर जाईल, असे उपाध्यक्ष डॉ. नौशाद फोर्ब्स यांनी सांगितले.\तिची दहा देशांतील कार्यालये संबंधित देशांमधील गरजांनुसार भारतातील उत्पादनांना तिथे बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करतील. ‘इज आॅफडुइंग बिझनेस’मध्ये पहिल्या ५०मध्ये येण्याचा निश्चय करण्यात आला आहे. - सुरेश प्रभू 

टॅग्स :सुरेश प्रभूभारतसरकार