Join us

रिझर्व्ह बँकेकडून सोलापूरच्या बँकेला दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 05:32 IST

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने सोलापूर जिल्ह्यातील दिलीप नागरी सहकारी बँकेला दोन लाखांचा दंड आकारला आहे.

नवी दिल्ली : नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने सोलापूर जिल्ह्यातील दिलीप नागरी सहकारी बँकेला दोन लाखांचा दंड आकारला आहे. बिगर घटनात्मक तरलता प्रमाणाच्या गुंतवणुकीशी संबंधित नियमांचे पालन न केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने हा दंड आकारला आहे.रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या बार्शी स्थित दिलीप नागरी सहकारी बँकेकडून या प्रकरणात उत्तर मागविण्यात आले होते. बँकेने आरबीआयच्या आलेल्या नोटिशीला उत्तर देताना जे तथ्य सादर केले, त्यातून याबाबत घालून दिलेल्या नियमांचे पालन केल्याचे सिद्ध करण्यात बँक अपयशी ठरली. आरबीआयचे सहायक सल्लागार अजित प्रसाद यांनी स्पष्ट केले की, कागदपत्रांतून या बँकेकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच बँकेला दंड आकारण्यात आला आहे.