Join us
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून SBI ने बंद केली 41.16 लाख खाती, तपासा तुमचं अकाउंटही नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 15:50 IST

खातेदारांना लावलेल्या शुल्कापोटी एसबीआयला तब्बल 1771. 67 कोटी रुपये मिळाले.

नवी दिल्ली - स्टेट बँक ऑफ इंडियानं 41.6 लाख खाती बंद केली आहेत. माहिती आधिकारामध्ये हा  खुलासा झाला. ज्यांनी मिनिमम बॅलन्स ठेवला नाही अशा खाती बंद करण्याचा निर्णय एसबीआयनं घेतला आहे. एप्रिल 2017 ते जानेवारी 2018 या दहा महिन्यामध्ये ज्या खातेदारांनी मिनिमम बॅलन्स ठेवला नाही अशी 41.16 लाख  अकाउंट बंद करण्यात आली आहे. यातील 16 कोटी खात्यांना मिनिमन बॅलन्सचे नियम लागू नाहीत. 

मध्यप्रदेशमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ता चंद्रशेखर गौड यांनी माहिती आधिकराअंतर्गत ही एसबीआयकडे याची विचारणा केली होती. 28 फेब्रुवारी रोजी चंद्रशेखर गौड यांना एसबीआयने ही माहिती पाठवली. वित्तमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते नोव्हेंबर 2017 या काळात खात्यावर किमान शिल्लक न ठेवणाऱ्या खातेदारांना लावलेल्या शुल्कापोटी एसबीआयला तब्बल 1771. 67 कोटी रुपये मिळाले. ही रक्कम बँकेच्या दुस-या तिमाहीतील नफ्यापेक्षा जास्त आहे. मिनिमम बॅलन्स ठेवू नये शकल्यामुळं खातेदार आपले अकाउंट वापरत नाही. त्यामुळं एसबीआयनं मिनिमम बॅलन्समध्ये 75 टक्के कपात केली आहे.  नवे शुल्क एक एप्रिलपासून लागू होणार आहे, असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

स्टेट बँक ऑफ इंडियात तुमचं खातं असेल आणि त्यातील रक्कम 'मिनिमम बॅलन्स'च्या खाली गेली तर आता तुम्हाला 50 रुपयांऐवजी फक्त 15 रुपयेच दंड भरावा लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिल 2018 पासून सुरू होईल. त्यामुळे देशभरातील तब्बल 25 कोटी खातेदारांना याचा फायदा होणार आहे.  मेट्रो आणि शहरी परीसरातील खातेदारांना मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास 50 रूपयांवरून  15 रूपये दंड केला आहे. लहान शहरांमध्ये चार्ज 40 रुपयांहून 12 रूपये करण्यात आला आहे. तर ग्रामीण भागांमध्ये मिनिमम बॅलन्स न ठेवण्यावरचा चार्ज 40 रूपये नाही तर 10 रूपये लागणार आहे. या चार्जवर जीएसटी वेगळा लागेल.  

टॅग्स :एसबीआयस्टेट बँक आॅफ इंडिया