Join us

...तर लॅपटाॅप अन् मोबाइल हाेणार स्वस्त?; ७० टक्के गरज देशातूनच पूर्ण करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 08:13 IST

केंद्र सरकारने पीएलआय याेजना आणली असून हे लक्ष्य तीन वर्षांमध्ये पूर्ण करायचे आहे.

नवी दिल्ली : तुमचे संगणक, माेबाईल फाेन, गाड्या इत्यादींसाठी चिप व इतर सुटे भाग फार महत्त्वाचे असतात. त्याची देशात माेठ्या प्रमाणावर आयात हाेते. मात्र, आता त्यांची ७० टक्के गरज देशातूनच पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 

केंद्र सरकारने पीएलआय याेजना आणली असून हे लक्ष्य तीन वर्षांमध्ये पूर्ण करायचे आहे. आयटी हार्डवेअरच्या आयातीवर सरकार निर्बंध लागू करणार आहे. याचा फायदा म्हणजे, देशातच उत्पादन हाेणार असल्याने खर्च कमी हाेईल. परिणामी या वस्तू काही प्रमाणात स्वस्त मिळतील. यासंदर्भात टेक कंपन्यांसाेबत सरकारची बैठक हाेणार आहे.