Join us

अर्थव्यवस्थेवर मंदीचा फेरा; केश तेलापासून मोटारसायकलींपर्यंत अनेक क्षेत्रांत मागणी घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 02:35 IST

येत्या ३0 आॅगस्ट रोजी जूनच्या तिमाहीतील वृद्धीदराची आकडेवारी जाहीर होणार आहे.

नवी दिल्ली : भारतीयांनी केसाच्या तेलापासून ते मोटारसायकलींपर्यंत बहुतांश वस्तूंवरील आपल्या खर्चात कपात केली आहे. त्यामुळे मागणीत मोठी घट झाली आहे. आशियातील तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेत मंदी आणखी हात-पाय पसरणार, असे दिसत आहे.मंदी अधिक गंभीर रूप धारण करीत असल्यामुळे आगामी काळात वित्तीय आणि पतविषयक धोरणांवर त्याचा परिणाम होणे अटळ आहे. रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी करून नऊ वर्षांच्या नीचांकावर नेले असले तरी कमी झालेल्या कर्ज मागणीवर त्याचा कोणताही सकारात्मक परिणाम अजून दिसून आलेला नाही.देशातील सर्वांत मोठी मोटारसायकल उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्पने शुक्रवारी जारी केलेल्या माहितीनुसार, मागणी घटल्यामुळे कंपनीने तीन दिवसांसाठी म्हणजेच १८ आॅगस्टपर्यंत आपले उत्पादन प्रकल्प बंद ठेवले आहेत. वाहनाचे सुटे भाग बनविणाºया सुंदरम-क्लेटॉन लि. या कंपनीने त्याच दिवशी तामिळनाडूतील पाडी येथील आपला कारखाना १७ आॅगस्टपर्यंत दोन दिवसांसाठी बंद केला आहे.सौंदर्य प्रसाधने आणि आरोग्य क्षेत्रातील कंपनी ‘इमामी’च्या संचालिका प्रीती ए. सुरेका यांनी सांगितले की, केसांसाठीच्या आमच्या उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणात घटली आहे. आम्ही किमती व्यवहार्य करण्याचा विचार करीत आहोत.हिंदुस्तान युनिलिव्हर आणि ब्रिटानिया इंडस्ट्रिज या कंपन्याही विक्रीतील घसरगुंडीचा सामना करीत आहेत. याचा देशाच्या एकूण वृद्धीदरावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. सार्वजनिक खर्च धीमा झाला असतानाच खाजगी उपभोगही (कंझम्पशन) घटला आहे.विश्लेषक काय म्हणतात...?येत्या ३0 आॅगस्ट रोजी जूनच्या तिमाहीतील वृद्धीदराची आकडेवारी जाहीर होणार आहे. विश्लेषकांच्या मते वृद्धीदर ६.१ टक्के राहील. जानेवारी ते मार्च या तिमाहीतील ५.८ टक्क्यांपेक्षा हा दर नक्कीच जास्त आहे. तथापि, गेल्या काही वर्षांतील ७ ते ८ टक्क्यांपेक्षा तो खूपच कमी आहे.जाणकारांच्या मते, बँकिंग क्षेत्रातील संकटामुळे खाजगी उपभोग घटला आहे. जीडीपीमध्ये खाजगी उपभोगाचे प्रमाण तब्बल ६0 टक्के आहे. अलीकडे केंद्रीय बँकेने केलेल्या ‘ग्राहक धारणा सर्वेक्षणा’त रोजगार हानीबाबत, तसेच अर्थव्यवस्थेतील मंदीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती.

टॅग्स :अर्थव्यवस्था