लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगभरातील मोठ्या उद्योग समूहांसाठी भारत ही एक आकर्षक बाजारपेठ राहिली आहेत. अनेक जागतिक समस्या, युद्ध, अशांतता असतानाही गुंतवणूकदारस्नेही वातावरणामुळे देशातील थेट परकीय गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. एप्रिल २००० ते सप्टेंबर २०२४ या कालखंडात भारतातील थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) १,००० अब्ज डॉलरपेक्षा अधिक झाली आहे. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेडने (डीपीआयआयटी) दिलेल्या आकडेवारीतून हे समोर आले आहे.
सर्वाधिक एफडीआय मॉरिशस य़ा देशातून आलेली आहे. त्यानंतर सिंगापूर, नेंदरलँड, जपान, इंग्लंड आणि युएई या देशांचा क्रमांक लागतो. जर्मनी आणि सायप्रश या देशांमधून एफडीआयचे प्रमाण लक्षणीय आहे.
मागील दशकाच्या तुलनेत ११९% वाढ
ही गुंतवणूक प्रामुख्याने सेवा क्षेत्र, कम्प्युटर सॉफ्टवेअर, हॉर्डवेअर, टेलिकम्युकेशन, ट्रेडिंग, कन्स्ट्रक्शन, ऑटोमाबाइल, केमिकल आणि फार्म या क्षेत्रामध्ये आहे. २०१४ पासून भारताने ६६७.४ अब्ज डॉलर्सची एफडीआय आकर्षिक केली. मागील दशकाच्या तुलनेत यात ११९ टक्के वाढ झाली आहे. ही गुंतवणूक ३१ राज्यांमध्ये ५७ विविध क्षेत्रांमध्ये करण्यात आली. आर्थिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते चांगले औद्योगिक उत्पादन, आकर्षक उत्पादन आधारित प्रोस्ताहन योजना यामुळे प्रतिकूल स्थितीतही २०२५ मध्ये एफडीआयमध्ये वाढ होऊ शकते.
एप्रिल २००० ते सप्टेंबर २०२४ या काळात देशात आलेल्या १,०३३.४० अब्ज डॉलरच्या एफडीआयमध्ये मॉरिशसचा वाटा १७७.१८ अब्ज डॉलर, सिंगापुरचा वाटा वाटा १६७.४७ अब्ज डॉलर तर अमेरिकेचा ६७.८ अब्ज डॉलर इतका आहे.