सिंगापूरची इन्व्हेस्टमेंट मॅनेजर झेंडर (Xander) यांच्याकडून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बंगळुरूच्या 'एम्बेसी गोल्फलिंक्स बिझनेस पार्क'मध्ये पाइनहर्स्ट नावाची एक ऑफिस बिल्डिंग आहे, ज्यामध्ये झेंडरची भागीदारी होती. आता झेंडरनं या मालमत्तेतून आपली भागीदारी काढून घेतली असून, ती 'Embassy Office Parks REIT' ला ८५२ कोटी रुपयांना विकली आहे.
काय आहे अधिक माहिती?
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, गेल्या डिसेंबरमध्येच या व्यवहाराची घोषणा करण्यात आली होती. आता ३ मार्च २०२६ रोजी ही डील अधिकृतपणे पूर्ण झाली आहे. भारतातील रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REIT) कडून एखाद्या थर्ड पार्टीकडून मालमत्ता खरेदी करण्याचं हे पहिलंच उदाहरण आहे.
आज बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ; पाहा काय आहे मुंबई, कोलकाता, चेन्नईत नवी किंमत
किती नफा झाला?
सिंगापूरच्या झेंडरनं बंगळुरूची ही मालमत्ता २०१८ मध्ये ३४० कोटी रुपयांना खरेदी केली होती. आता या मालमत्तेची विक्री ८५२ कोटी रुपयांच्या डीलमध्ये झाली आहे. याचाच अर्थ, सुमारे आठ वर्षांच्या होल्डिंग कालावधीत कंपनीला ४ पटींहून अधिक नफा झालाय.
सध्या देशातील महानगरांमध्ये ऑफिस स्पेसची मागणी झपाट्यानं वाढत आहे, म्हणूनच REIT आपल्या पोर्टफोलिओमध्ये अशा मालमत्तांचा प्रभावीपणे समावेश करत आहेत. सध्या भारतात बंगळुरू, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली-एनसीआर हे ऑफिस स्पेसचे सर्वात मोठे बाजार म्हणून उदयास आले आहेत. याला ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स, तंत्रज्ञान कंपन्या आणि देशांतर्गत कंपन्यांकडून आलेल्या मागणीचा मोठा आधार मिळालाय.
Web Summary : Xander sold its stake in a Bangalore office building to Embassy Office Parks REIT for ₹852 crore, realizing over four times the initial investment made in 2018. The deal highlights the growing demand for office space in major Indian cities.
Web Summary : ज़ेंडर ने बेंगलुरु में एक ऑफिस बिल्डिंग में अपनी हिस्सेदारी एम्बेसी ऑफिस पार्क्स आरईआईटी को ₹852 करोड़ में बेच दी, जिससे 2018 में किए गए शुरुआती निवेश से चार गुना अधिक लाभ हुआ। यह सौदा भारतीय शहरों में ऑफिस स्पेस की बढ़ती मांग को दर्शाता है।