Join us  

अलर्ट! फेक सिमद्वारे रिकामं होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट; असा करा बचाव, 'या' गोष्टी ठेवा लक्षात 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 3:55 PM

Sim Swap Fraud : सायबर क्राईमच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असून फसवणुकीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत.

नवी दिल्ली - सध्या अनेक लोक बँकिंगसाठी इंटरनेट आणि मोबाईलचा वापर करतात. लोकांना अकाऊंट संबंधित अलर्ट, आर्थिक व्यवहारासाठी आवश्यक असलेला वन टाइम पासवर्ड (OTP), युनिक रजिस्ट्रेशन नंबर, 3D सुरक्षित कोड इत्यादी गोष्टी या स्मार्टफोनद्वारे मिळतात. मात्र सायबर गुन्हेगार त्याचा गैरफायदा घेत आहेत. सायबर क्राईमच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असून फसवणुकीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. यापैकी एक म्हणजे सिम स्वॅप (Sim Swap Fraud). 

सिम स्वॅप म्हणजे काय?

गुन्हेगार मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडरद्वारे तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकासाठी नवीन सिम कार्ड जारी करतात. नवीन सिम कार्डच्या मदतीने गुन्हेगाराला आवश्यक URN/OTP आणि तुमच्या बँक खात्याद्वारे केलेल्या आर्थिक व्यवहारासाठी अलर्ट मिळतो.

गुन्हेगार कसे लक्ष्य करतात?

- सायबर गुन्हेगार आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि बँक खात्याचा तपशील फिशिंग किंवा मालवेअरद्वारे मिळवतात. 

- मोबाईल हरवण्याच्या बहाण्याने ते मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडरशी योग्य ग्राहक ओळखीने संपर्क साधतात, 

- सिम कार्ड खराब होते. ग्राहक व्हेरिफिकेशन नंतर मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर ग्राहकांसह जुने सिम कार्ड निष्क्रिय करतो आणि गुन्हेगाराला नवीन सिम कार्ड जारी करतो. 

- ग्राहकांच्या फोनवर नेटवर्क उपलब्ध होणार नाही. आता ग्राहकाला कोणताही एसएमएस, अलर्ट, ओटीपी, यूआरएन इत्यादी माहिती त्याच्या फोनवर मिळणार नाही.

- फिशिंग किंवा मालवेअरद्वारे चोरलेल्या बँकिंग तपशिलांद्वारे गुन्हेगार आपल्या खात्यात प्रवेश आणि ऑपरेट करण्यास सक्षम असेल. तो आर्थिक व्यवहार करण्यास देखील सक्षम असेल, ज्याबद्दल आपल्याला माहिती मिळणार नाही. सर्व एसएमएस गुन्हेगाराला अलर्ट, पेमेंट कन्फर्मेशन इत्यादीसाठी जातील.

सिम स्वॅप टाळण्यासाठी सेफ्टी टिप्स

- सतर्क राहा आणि आपल्या मोबाईल फोनच्या नेटवर्क कनेक्टिव्हिटी स्थितीबद्दल जागरूक राहा. जर तुम्हाला असे आढळले की, तुम्हाला बराच काळ कॉल किंवा एसएमएस सूचना येत नाहीत, तर काहीतरी चुकीचे असू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही फसवणुकीला बळी पडत नाही ना याची खात्री करण्यासाठी तुम्ही मोबाईल ऑपरेटरकडे चौकशी करावी.

- काही मोबाईल नेटवर्क ऑपरेटर सिम स्वॅपबद्दल ग्राहकांना सतर्क करण्यासाठी एसएमएस पाठवतात. याचा अर्थ तुम्ही कारवाई करू शकता आणि ही फसवणूक थांबवू शकता, यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल ऑपरेटरशी त्वरित संपर्क साधावा लागेल. 

- आपल्या फोनवर सतत अनोळखी लोकांचे कॉल आल्यास आपला फोन बंद करू नका, फक्त त्यांना उत्तर देऊ नका. तुमचा फोन बंद करण्याची ही एक युक्ती असू शकते, जेणेकरून तुम्हाला माहीत नसेल की तुमच्या फोनच्या कनेक्टिव्हिटीमध्ये छेडछाड झाली आहे. 

- अलर्टसाठी नोंदणी करा, जेणेकरून तुमच्या बँक खात्यावर काही अ‍ॅक्टिव्हिटी असल्यास तुम्हाला अलर्ट मिळेल. कोणत्याही त्रुटी शोधण्यात मदत करण्यासाठी नेहमी आपले बँक स्टेटमेंट आणि ऑनलाईन बँकिंग हिस्ट्री तपासा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :बँकधोकेबाजीभारत