Join us

चांदी पुन्हा एक हजार रुपयांनी वधारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 01:50 IST

Silver rate : इंग्लंडमधील नवीन विषाणूचा पुन्हा बाजारपेठेवर परिणाम होणार अशा शक्यतेने आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असलेल्या सोने-चांदीच्या दरावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे.

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच असून दोन दिवसांपूर्वी तीन हजार रुपयांनी घसरण झालेल्या चांदीच्या दरात शुक्रवारी पुन्हा एक हजार रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे चांदी ६८ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर तर सोन्याच्याही दरात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार ९०० रुपये प्रतितोळ्यावर पोहचले.इंग्लंडमधील नवीन विषाणूचा पुन्हा बाजारपेठेवर परिणाम होणार अशा शक्यतेने आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असलेल्या सोने-चांदीच्या दरावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. तसेच सट्टा बाजारातही सतत खरेदी-विक्री कमी जास्त प्रमाणात केली जात आहे. त्यामुळे चांदीला पुन्हा झळाळी येणार आहे. 

चढ-उतार कायम२३ डिसेंबर रोजी तीन हजार रुपयांनी घसरण होऊन ६७ हजार ५०० रुपयांवर आलेल्या चांदीच्या दरात शुक्रवार, २५ डिसेंबर रोजी पुन्हा एक हजार रुपयांनी वाढ होऊन चांदी ६८ हजार ५०० रुपयांवर पोहोचली.  २३ डिसेंबर रोजी ३०० रुपयांनी घसरण होऊन ५० हजार ७०० रुपयांवर आलेल्या सोन्याच्याही दरात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार ९०० रुपयांवर पोहोचले.

टॅग्स :चांदी