Join us  

Silver Rate: अवघ्या एका दिवसात चांदीच्या भावात १५०० रुपयांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 4:02 AM

महिनाभरात ३००० रुपयांनी महाग; सोन्यात १०० रुपयांची घसरण

जळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर तस्कर सक्रीय झाल्याने व चीन सोबतच्या व्यापार युद्धाच्या मुद्यावरून चांदीच्या भावात एकाच दिवसात तब्बल दीड हजार रुपये प्रती किलोने वाढ झाली आहे. मागणी नसताना ही वाढ झाल्याने सराफ व्यावसायिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चांदीचे भाव वाढले असले तरी सोन्याच्या भावात मात्र १०० रुपये प्रती तोळ््याने घसरण झाली आहे.

सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच अमेरिकन डॉलर व आंतरराष्ट्रीय पातळीवरील भावाचाही मोठा परिणाम होऊन त्यांचे भाव कमी जास्त होत असतात. अशाच प्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीची तस्करी वाढून त्यांच्या भावात कृत्रिम वाढ होत आहे.अनेक देशांनी चीनकडून साहित्य खरेदी न करण्याची तयारी सुरू केल्याने एका प्रकारे चीन सोबत व्यापार युद्धच सुरू झाले आहे. त्यामुळे ब्राझील, स्पेन, जर्मनी, लंडन, येथून येणाऱ्या चांदीच्या भावावर परिणाम होऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीचे भाव वधारले. १९ जून रोजी सोन्यासह चांदीच्याही भावत मोठी वाढ झाली होती. त्या दिवशी चांदी ५०० रुपये प्रती किलोने वाढली व ती ३८ हजार ५०० रुपयांवरून ३९ हजार रुपये प्रती किलोवर पोहोचली होती. त्यानंतर ५ जुलै रोजी ३९ हजार ५०० रुपये प्रती किलो चांदीचे भाव झाले. ११ जुलै रोजी चांदीने ४० हजार रुपये प्रती किलोचा टप्पा गाठला. तेव्हापासून १७ जुलैचा अपवाद (३९ हजार ५०० रुपये प्रती किलो) चांदी ४० हजार रुपयांवर होती. त्यानंतर २३ जुलै रोजी एकाच दिवसात थेट दीड हजार रुपये प्रती किलोने वाढ होऊन चांदी ४१ हजार ५००रुपयांवर पोहचली.

मागणी नसूनही : एरव्ही दरवर्षी जुलै, आॅगस्ट महिन्यात सोने-चांदीचे भाव कमी होतात. मात्र या वेळी जुलै महिन्यात चांदीचे भाव मागणी नसताना वधारले आहे. चीनसोबतच्या व्यापार युद्धामुळे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमुळे चांदीचे भाव वधारले आहे.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

टॅग्स :सोनंचांदी