नवी दिल्ली - जागतिक बाजारपेठेतील प्रचंड अस्थिरता आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला ओढा यामुळे गुरुवारी सराफा बाजारात ऐतिहासिक उसळी पाहायला मिळाली.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत चांदीच्या दराने चार लाख रुपये प्रति किलोचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे, तर सोन्यानेही १.८३ लाख रुपये प्रति १० ग्रॅमचा नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या २९ दिवसांत चांदीची किंमत १,७५,२५० रुपयांनी वाढली आहे. ही वाढ तब्बल ७६.४४ टक्के आहे.
गुरुवारी सोन्याच्या दरात एकाच दिवशी १२,००० रुपयांची (७.०२%) प्रचंड वाढ झाली. बुधवारी १,७१,००० रुपयांवर असलेले सोने आज थेट १,८३,००० रुपयांवर पोहोचले. चांदीमध्येही १९,५०० रुपयांची विक्रमी वाढ होऊन तिने ४,०४,५०० रुपये प्रति किलोचा स्तर गाठला आहे.
पुढे काय होणार? बाजारातील तज्ज्ञांच्या मते, जागतिक घडामोडी आणि आर्थिक अनिश्चितता कायम राहिल्यास सराफा बाजारातील चढ-उतार आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष येत्या काळातही सोने-चांदीकडे केंद्रित राहण्याची चिन्हे आहेत.
भाववाढीची कारणे काय? जागतिक तणाव : अमेरिका व इराणमधील वाढता तणाव, आखाती देशांमधील लष्करी हालचालींमुळे गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीला पसंती दिली आहे.डॉलरमध्ये घसरण : अमेरिकन डॉलरच्या मूल्यात झालेली घसरण हेदेखील भाववाढीचे प्रमुख कारण ठरले आहे.जागतिक बाजार : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर ५,५९५ डॉलर प्रति औंस, तर चांदी १२० डॉलर प्रति औंसच्या विक्रमी पातळीवर पोहोचली.
Web Summary : Global instability fuels record surge in Indian bullion market. Silver crosses ₹4 lakhs/kg, gold hits ₹1.83 lakhs/10 grams. Experts anticipate continued volatility due to geopolitical tensions and dollar depreciation.
Web Summary : वैश्विक अस्थिरता से भारतीय सर्राफा बाजार में उछाल। चांदी 4 लाख रुपये/किलो पार, सोना 1.83 लाख रुपये/10 ग्राम। भू-राजनीतिक तनाव और डॉलर में गिरावट से अस्थिरता जारी रहने की आशंका।