नागपूर: आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी आणि औद्योगिक क्षेत्रांकडून मागणी वाढल्याने देशांतर्गत आणि स्थानिक सराफा बाजारात चांदीचे दर पुन्हा एकदा विक्रमी स्तरावर पोहोचले. नागपुरात जीएसटीविना प्रति किलो शुद्ध चांदीचे दर ९७,००० रुपये आणि ३ टक्के जीएसटीसह ९९,९१० रुपयांवर पोहोचले. लवकरच लाखावर जाण्याची शक्यता सराफांनी व्यक्त केली.
१ फेब्रुवारीला जीएसटीविना चांदीचे दर ९४ हजार रुपये होते. ३ रोजी एक हजाराची वाढ झाली. ५ रोजी दर ९६,६०० रुपयांवर पोहोचले. १० रोजी ९६,५०० रुपयांवर स्थिरावले. ११ रोजी २,५०० रुपयांची घसरण होऊन दर ९४ हजारांपर्यंत खाली आले. १२ रोजी १,४०० रुपये आणि १३ रोजी १,२०० रुपयांची वाढ होऊन दरपातळी ९६,६०० रुपयांवर पोहोचली. सोमवार, १७ रोजी चांदीचे दर शनिवारएवढेच ९६,५०० रुपयांवर स्थिर होते. मात्र, मंगळवार, १८ रोजी दर ५०० रुपयांनी वाढून ९७ हजारांवर पोहोचले. नागपुरात सराफांकडे प्रति किलो चांदी ३ टक्के जीएसटीसह ९९,९१० रुपयांत विकल्या गेली. याआधी चांदीने लाख रुपये दराचा आकडा गाठला होता.