पवन देशपांडेलोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जागतिक मागणीत वाढ व डॉलर कमकुवत झाल्याने सोमवारी चांदीच्या किमतीत ७ हजारांनी वाढ होत ती प्रतिकिलो दीड लाख रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली. सोन्यात १,५०० रुपयांची वाढ होत ते प्रति १० ग्रॅम १,१९,५०० रुपयांच्या उच्चाकांवर पोहोचले. यामुळे सोने-चांदी आवाक्याबाहेर गेली आहे. मात्र, ज्यांनी सोने-चांदीत गुंतवणूक केली आहे, त्यांना गेल्या ९ महिन्यांत ५६% ते ७५% परतावा मिळाला आहे.
चांदीत ७४.६% परतावाजानेवारीत प्रतिकिलो चांदीची किंमत ८५,९१३ रुपये होती. सप्टेंबरअखेर ती झेपावत १,५०,००० रुपयांवर पोहोचली. म्हणजेच चांदीने गुंतवणूकदारांना जवळपास ७५% परतावा दिला आहे.
किंमत का वाढतेय?जागतिक मागणी वाढणे I डॉलर कमकुवत होणे I जागतिक तणाव I आर्थिक अनिश्चितता I सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे कल
Web Summary : Silver hits a record ₹1.5 lakh/kg, soaring 75% in nine months. Gold also rises. Global demand, a weak dollar, and economic uncertainty drive investors towards precious metals as safe havens.
Web Summary : चांदी ₹1.5 लाख प्रति किलो के रिकॉर्ड स्तर पर, नौ महीनों में 75% बढ़ी। सोना भी बढ़ा। वैश्विक मांग, कमजोर डॉलर और आर्थिक अनिश्चितता निवेशकों को सुरक्षित ठिकाने के रूप में कीमती धातुओं की ओर खींच रही है।