Join us  

ईएसआयसीतर्फे मिळणाऱ्या प्रसूती लाभांत घसघशीत वाढ   

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 3:34 AM

ESIC News : केंद्रीय श्रम मंत्रालयाने यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. सूत्रांनी सांगितले की, कर्मचारी राज्य विमा (केंद्रीय) नियम, १९५० मधील ५१ब नियम रद्द करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : कर्मचारी राज्य विमा महामंडळ योजनेच्या (ईएसआयसी) नियमांत केंद्रीय श्रम मंत्रालयाने बदल केले आहेत. या बदलान्वये नवीन क्षेत्रासाठी कमी योगदानाची सवलत रद्द करण्यात आली असून, प्रसूती लाभ ५ हजार रुपयांवरून ७,५०० रुपये करण्यात आला आहे. केंद्रीय श्रम मंत्रालयाने यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे.  सूत्रांनी सांगितले की, कर्मचारी राज्य विमा (केंद्रीय) नियम, १९५० मधील ५१ब नियम रद्द करण्यात आला आहे. या कलमान्वये पहिल्यांदाच ईएसआयसी कायदा राबविण्यात येत असलेल्या क्षेत्रात रोजगारदात्याचे ईएसआयसी योगदान ३ टक्के आणि कर्मचाऱ्याचे योगदान १ टक्का इतके ठेवण्यात आले होते. २४ महिन्यांनंतर रोजगारदात्याचे योगदान ४.७५ टक्के आणि कर्मचाऱ्याचे योगदान १.७५ टक्के करण्यात येत होते. ५१ब हा नियमच रद्द करण्यात आल्यामुळे सुरुवातीच्या काळातील कमी योगदानाची सवलत आपोआप रद्द झाली आहे. रोजगारदाता आणि रोजगारकर्ता अशा दोघांच्याही योगदानात त्यामुळे वाढ झाली आहे. याशिवाय ईएसआयसीअंतर्गत देण्यात येणारी प्रसूती प्रतिपूर्ती लाभाची सवलत ५ हजार रुपयांवरून ७,५०० रुपये करण्यात आली आहे. त्यासाठी या कायद्यातील कमल ५६-अ मध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलांची अधिसूचना केंद्रीय श्रम मंत्रालयाने जारी केली आहे.  योजनेच्या लाभार्थी पत्नीसाठी प्रसूती खर्च देय आहे. तसेच केवळ दोन बाळंतपणांसाठीच हा खर्च मिळेल. 

टॅग्स :पैसा