Join us
Daily Top 2Weekly Top 5

ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज; १०,००० कोटींचे साम्राज्य, 'या' चुकीमुळे कवडीमोल भावात विकावी लागली कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 18:02 IST

Shopclues Downfall : Amazon आणि Flipkart सारख्या कंपन्यांमुळे बसला मोठा फटका!

Shopclues Downfall : एकेकाळी देशातील अग्रगण्य ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये गणली जाणारी ShopClues आज नाहीशी झाली आहे. २०१६ मध्ये सुमारे १० हजार कोटी रुपयांच्या मूल्यांकनावर पोहोचलेली ही कंपनी काही वर्षांतच कोसळली आणि अखेर कवडीमोल भावात विकली गेली.

कोणी सुरू केलेली शॉपक्लुज ?

IIT BHU मधून शिक्षण घेतलेल्या संजय सेठी यांनी विविध कंपन्यांमध्ये १५ वर्षांहून अधिक काळ काम केले. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी संदीप अग्रवाल आणि राधिका अग्रवाल यांच्यासोबत ShopClues ची स्थापना केली. ही कंपनी विशेषतः टियर-२ आणि टियर-३ शहरांतील ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून उभी करण्यात आली होती.

अल्पावधीत मोठी झेप

२०१६ मध्ये कंपनीचे मूल्यांकन सुमारे १.१ अब्ज डॉलर (१० हजार कोटी रुपये) होते. स्वस्त आणि नॉन-ब्रँडेड उत्पादनांमुळे छोट्या शहरांत याची लोकप्रियता प्रचंड वाढली. जलद विस्तारामुळे कंपनीने ई-कॉमर्स क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, काही वर्षानंतर कंपनीचे वाईट दिवस सुरू झाले.

२०१९ मध्ये मोठी घसरण; स्वस्तात विक्री

व्यवसायातील अडचणी वाढत गेल्याने कंपनीची आर्थिक स्थिती कमकुवत झाली. २०१९ मध्ये सिंगापूरस्थित Qoo10 ने कंपनीने तिचे अधिग्रहण केले. हा व्यवहार ७० ते १०० दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच पूर्वीच्या मूल्यांकनापेक्षा सुमारे ९०% कमी होता.

स्पर्धेमुळे बाजारातील पकड कमी

Amazon आणि Flipkart यांनी छोट्या शहरांमध्ये आपला आक्रमक विस्तार सुरू केला. चांगली लॉजिस्टिक्स व्यवस्था, अधिक सवलती आणि ग्राहकांचा विश्वास यामुळे ShopClues चा बाजारातील हिस्सा झपाट्याने कमी झाला.

गुणवत्तेच्या समस्यांमुळे प्रतिमा धोक्यात

असंघटित विक्रेत्यांवर जास्त अवलंबित्व आणि कमी दर्जाच्या आणि नकली वस्तूंची विक्री, यामुळे कंपनीच्या प्रोडक्टचा रिटर्न दर ३० ते ४० टक्क्यांवर आला. या सर्व गोष्टींमुळे ग्राहकांचा कंपनीवरील विश्वास कमी झाला आणि ब्रँड इमेजला मोठा धक्का बसला.

अंतर्गत वाद आणि व्यवस्थापनातील अडचणी

सह-संस्थापक संदीप अग्रवाल यांनी अमेरिकेत इनसाइडर ट्रेडिंग आरोपांनंतर पद सोडले. यानंतर संस्थापकांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आणि गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला. कंपनीने नफा दाखवण्यासाठी मार्केटिंग खर्चात मोठी कपात केली, ज्यामुळे विक्रीवर परिणाम झाला. यामुळे नवीन गुंतवणूक मिळवण्यात अपयश तर आलेच, शिवाय विद्यमान गुंतवणूकदारांनीही हात आखडता घेतला. या सर्व गोष्टींमुळे भारतीय बाजारातून शॉपक्लुज नाहीशी झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Shopclues Downfall: From E-commerce Giant to Near Worthless Sale

Web Summary : Shopclues, once a leading e-commerce company valued at ₹10,000 crore, collapsed due to competition, quality issues, and internal conflicts. Ultimately, it was sold for a fraction of its former value after aggressive expansions by Amazon and Flipkart eroded its market share and investor confidence waned.
टॅग्स :व्यवसायगुंतवणूकफ्लिपकार्टअ‍ॅमेझॉन