Sheikh Hasina Net Worth: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणानं (ICT) तीन गंभीर प्रकरणांमध्ये दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे. ५ ऑगस्ट २०२४ रोजी बांगलादेशात विद्यार्थ्यांचा उठाव झाल्यानंतर शेख हसीना यांना देश सोडून दिल्लीला आश्रय घ्यावा लागला. २००९ पासून सत्तेत असलेल्या हसीना बांगलादेशच्या सर्वाधिक काळ सेवा देणाऱ्या पंतप्रधान ठरल्या आहेत.
सत्ता सोडल्यानंतर, त्यांचा कार्यकाळ आणि खासगी मालमत्तेबद्दल चर्चांना उधाण आलं आहे. याच दरम्यान एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे, ज्यात असा दावा करण्यात आला आहे की, त्यांच्या घरी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याकडे २८४ कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
चौकशीचे दिलेले आदेश
समोर आलेल्या माहितीनुसार, हसीना यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या जहांगीर आलम नावाच्या कर्मचाऱ्याकडे प्रचंड मालमत्ता आढळून आली आहे आणि तो सध्या अमेरिकेत राहत आहे. इतकी मोठी रक्कम समोर आल्यानंतर, खुद्द हसीना यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. आलमची मालमत्ता आणि हसीना यांच्या घोषित केलेल्या निव्वळ संपत्तीत मोठं अंतर असल्यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, विशेषतः अशा वेळी जेव्हा देश राजकीय अस्थिरतेतून जात आहे.
हसीना यांची घोषित मालमत्ता फक्त ३.१४ कोटी रुपये
२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रानुसार, शेख हसीना यांच्याकडे एकूण ३.१४ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत शेती असून, त्यात सहा एकर जमीन आणि मत्स्यपालन (फिश फार्मिंग) यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, त्यांच्याकडे भेट म्हणून मिळालेली एक कार आहे. पंतप्रधान असताना त्यांचं वार्षिक वेतन सुमारे ९.९३ लाख रुपये होते. या आकडेवारीमुळे, त्यांच्या एका कर्मचाऱ्याकडे इतकी मोठी संपत्ती कशी आली, हा प्रश्न अधिकच गडद झाला आहे.
राजकीय संकटात पारदर्शकतेची मागणी वाढली
बांगलादेशात सुरू असलेल्या राजकीय संकटात हा मुद्दा लोकांमध्ये चर्चेचा केंद्र बनला आहे. हसीना यांची दीर्घकाळातील सत्ता, त्यांचा कौटुंबिक इतिहास आणि आता त्यांच्या मालमत्तेबद्दल उपस्थित होत असलेल्या प्रश्नांमुळे राजकीय वातावरण अधिक तापलं आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, या खुलाशांमुळे सरकारवर पारदर्शकता आणि जबाबदारीसाठी दबाव वाढेल. सध्या, नोकराच्या मालमत्तेचं सत्य काय आहे आणि हे प्रकरण कोणत्या दिशेनं जातं, हे पाहावं लागणार आहे.
Web Summary : Ex-PM Sheikh Hasina faces scrutiny after a servant was found with millions. Despite Hasina declaring assets of ₹3.14 crore, her servant possessed ₹284 crore, prompting investigation and raising questions about transparency amid political turmoil.
Web Summary : पूर्व पीएम शेख हसीना की संपत्ति जांच के दायरे में है, क्योंकि उनके एक नौकर के पास करोड़ों की संपत्ति मिली है। हसीना ने ₹3.14 करोड़ की संपत्ति घोषित की, जबकि नौकर के पास ₹284 करोड़ थे, जिससे जांच शुरू हो गई और पारदर्शिता पर सवाल उठ रहे हैं।