Join us  

शताब्दी, राजधानी ट्रेनचे होणार खासगीकरण, रेल्वे मंत्रालयाने केली तयारी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 1:42 PM

भारतीय रेल्वेमध्ये आमुलाग्र बदल करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून गेल्या काही काळापासून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान...

नवी दिल्ली  - भारतीय रेल्वेमध्ये आमुलाग्र बदल करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून गेल्या काही काळापासून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, शताब्दी, राजधानीसारख्या काही गाड्यांच्या खासगीकरणाबाबत रेल्वेकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. शताब्दी, राजधानी यासारख्या प्रीमियम गाड्या चालवण्याची जबाबदारी खासगी कंपन्यांकडे देण्यात येऊ शकते. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून 100 दिवसांचे एक लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून, त्यामध्ये ट्रेन चालवण्याचा परवाना खासगी कंपन्यांना देण्याची योजना आखण्यात आली आहे.  रेल्वेमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजधानी आणि शताब्दीसारख्या प्रीमियम ट्रेन फायद्यात चालत आहेत. त्यामुळे अशा ट्रेन चालवण्यासाठी घेण्यास खासगी कंपन्या अधिक इच्छुक असतील. त्यामुळे खासगी क्षेत्राची भागीदारी वाढवण्यासाठी प्रीमियम ट्रेन चालवण्याचा परवाना लवकरात लवकर खासगी क्षेत्राकडे सोपवण्यासाठी रेल्वे मंत्रालय प्रयत्नशील आहे.  प्रीमियम ट्रेन खासगी हातांमध्ये सोपवल्याने या ट्रेनमधील प्रवाशी सुविधांमध्ये वाढ होईल, असे सांगितले जात आहे. तसेच त्यामुळे रेल्वेला कमर्शियल ऑपरेशनमध्ये खासगी क्षेत्र चांगल्या सुविधा प्रदान करेल. मात्र या ट्रेनचा परवाना घेऊन गुंतवणुकदाराने ट्रेन चालवण्यासाठी घेतली तरी ट्रेनचे डबे आणि इंजिनाची जबाबदारी रेल्वेकडेच राहील. तसेच रेल्वे या प्रवासासाठीच्या रेल्वेच्या भाड्याची कमाल किंमत निश्चि करणार आहे. त्यामुळे परवानाधारक विमा कंपन्या या मर्यादेपेक्षा जास्त भाडेवसुली करू शकणार नाहीत.   

टॅग्स :भारतीय रेल्वेसरकार