Join us  

Share Market Crash : शेअर बाजारात १ हजार अंकांची घसरण, सर्वच सेक्टर ‘रेड झोन’मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 11:24 AM

Share Market Crash : यापूर्वी बुधवारीही शेअर बाजारात घसरण दिसून आली होती.

Share Market Update : सातत्यानं होत असलेल्या विक्रीमुळे गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे, आज गुरूवारी राष्ट्रीय शेअर बाजार १६ हजाक अंकांच्याही खाली गेला. तर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकातही १ हजार अंकांची घसरण झाली. 

गुरूवारी कामाकाजादरम्यान मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात १ हजार ६२ अंकांची घसरण होऊन तो ५३,०१८.२१ अंकांवर आला. निफ्टी आणि पीएसयू बँक इंडेक्सवर ३ टक्क्यांची घसरण दिसून आली. पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओवरसीज बँक आणि पंजाब व सिंध बँकांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. निफ्टीवर मेटल, फायनॅन्स आणि ऑटो क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांची घसरण दिसून आली.

मुंबई शेअर बाजाराच्या सुरूवातीच्या सत्रात पॉवरग्रिड सोडून अन्य सर्वच शेअर्समध्ये घसरणची सत्र दिसून आलं. अल्ट्राटेक सीमेंट, टाटा स्टील, बजाज फायनॅन्स, एम अँड एम, इंडसइंड बँक, एचडीएफसी, बजाज फिनसर्व्ह, लार्सन अँड टुब्रो हे सर्वाधिक पडणाऱ्या प्रमुख शेअर्समध्ये दिसून आले. 

रुपयाचं मूल्य घसरलंगुरूवारी रुपयाचं मूल्यही विक्रमी स्तरावर घसरल्याचं दिसून आलं. यापूर्वी मंगळवारी रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण दिसून आली होती. आशियाई चलनांतील घसरणीदरम्यान सुरूवातीच्या कामाकाजादरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपया ३० पैशांनी घसरून ७७.५५ रुपयांवर आला.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक