Join us  

Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 1:26 PM

Share Market Upcoming IPO : मे महिन्यात शेअर बाजारात 'आयपीओं'चा (IPO) वर्षाव होणार असून, याद्वारे कंपन्या दहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उभी करणार आहेत.

Share Market Upcoming IPO : मे महिन्यात शेअर बाजारात 'आयपीओं'चा (IPO) वर्षाव होणार असून, याद्वारे कंपन्या दहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उभी करणार आहेत. डिजिटल सेवा संस्था इंडेजीनचा आयपीओ ६ मे रोजी उघडणार आहे. आधार हाउसिंग फायनान्स व ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी टीबीओ टेकचा आयपीओ ८ मे रोजी उघडणार आहे. 

का वाढले आयपीओ? 

निवडणूक काळात आयपीओ कमी येतात. यंदा मात्र मागील ४ लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत ७ पट अधिक आयपीओ आलेत. गुंतवणूकदारांतील उत्साह, जबरदस्त जीडीपी वृद्धी दर आणि भारताबाबतचा सकारात्मक कल यामुळे यंदा निवडणूक काळात आयपीओ वाढले आहेत.

 

या महिन्यात 'हे' आयपीओ येणार 

  • गो डिजिट (३,५०० कोटी रुपये)
  • आधार हाउसिंग फायनान्स (३००० कोटी रुपये) 
  • इंडेजिन (१८४१ कोटी रुपये)
  • ऑफिस स्पेस सोल्यूशन्स (१००० कोटी रुपये)
  • टीबीओ टेक (१००० कोटी रुपये)
  • क्रोनॉक्स  (१५० कोटी रुपये) 

एसएमई आयपीओही दाखवतील जलवा 

  • विन्सोल इंजिनिअर्स: या एसएमई कंपनीचा २३.३६ कोटी रुपयांचा आयपीओ ६ ते ९ मे या काळात खुला असेल. याची इश्यू प्राइस ७१ ते ७५ रुपये आहे. 
  • स्लोन इन्फोसिस्टम्स : या कंपनीचा ११ कोटींचा आयपीओ ३ ते ७ मे दरम्यान खुला असेल. याची इश्यू प्राइस ७९ रुपये आहे. 
  • रीफ्रँक्री शेप्स : या कंपनीचा १८.६ कोटी रुपयांचा आयपीओ ६ ते ९ मे दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. याची इश्यू प्राइस २७ ते ३१ रुपयांदरम्यान असेल. 
  • फाइनलिस्टिंग्ज टेक: हा १३.५३ कोटींचा आयपीओ ७ मे ते ९ मे दरम्यान चालेल. इश्यू प्राइस १२३ रुपये असेल.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार