Join us

बाजारातील तेजीला ब्रेक! BSE व निफ्टी निर्देशांक किरकोळ घसरण नोंदवून बंद

By देवेश फडके | Updated: February 9, 2021 17:22 IST

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर तेजीत असलेल्या शेअर बाजार निर्देशांकाच्या वाढीला ब्रेक लागला आहे. मुंबई शेअर बाजार आणि निफ्टी निर्देशांक किरकोळ घसरण नोंदवून बंद झाले.

ठळक मुद्देशेअर बाजारातील तेजीला ब्रेकमुंबई शेअर बाजार आणि निफ्टी निर्देशांक किरकोळ घसरण नोंदवून बंदसकाळच्या सत्रात सेन्सेक्स विक्रमी पातळीवर पोहोचले

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर तेजीत असलेल्या शेअर बाजार निर्देशांकाच्या वाढीला ब्रेक लागला आहे. मुंबई शेअर बाजार आणि निफ्टी निर्देशांक किरकोळ घसरण नोंदवून बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १९.६९ अंकांच्या घसरणीसह ५१ हजार ३२९ अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे निफ्टी निर्देशांकात ६.५० अंकांची घसरण होऊन तो १५ हजार १०९.३० अंकांच्या स्तरावर बंद झाला. (share market and nifty closed with red mark today)

गेल्या सहा दिवसांत गुंतणूकदारांच्या संपत्तीत १६.७० लाख कोटी रुपयांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. ०१ फेब्रुवारी २०२१ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सलग काही दिवस शेअर बाजारात तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांमधील भांडवल १६.७० लाख कोटीवरून २०.२८ लाख कोटी रुपयांवर गेले असून, हा आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा असल्याचे सांगितले जात आहे. एकूण आढावा घेतल्यास गेल्या काही दिवसांमधील तेजी पाहता मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५ हजार अंकांनी वधारला. 

HDFC आणि कॅनरा बँकेनं कमी केला MCLR; तुमचा EMI होणार कमी

दिग्गज कंपन्यांचे समभागांची आजची स्थिती

शेअर बाजारातील मोठ्या कंपन्यांच्या विचार केल्यास एसबीआय लाइफ, एशियन पेंट्स, एचडीएफसी लाइफ, ओएनजीसी आणि आयओसी या कंपन्यांचे समभाग वधारले. तर, टाटा मोटर्स, एम अँड एम, जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी आणि बजाज ऑटो या कंपन्यांचे समभाग घसरलेले पाहायला मिळाले.

दरम्यान, सकाळच्या सत्रात शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. सलग सातव्या सत्रात शेअर निर्देशांकांनी तेजीची आगेकूच कायम होती. अमेरिकेत आर्थिक पॅकेजमध्ये वाढ होण्याची शक्यता, केंद्र सरकारचे करवाढ नसलेले बजेट आणि देशातील करोना लसीकरण मोहिमेला वेग आल्यानंतर भांडवली बाजारात गुंतवणुकीचा ओघ कायम राहिला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने ५१ हजार ७१२ अंकाची विक्रमी पातळी गाठली होती. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये अनुक्रमे ०.४ टक्के आणि ०.३ टक्के वाढ झाली होती. 

टॅग्स :शेअर बाजारनिफ्टीशेअर बाजार