Join us

Shahrukh Khan: दिवाळीआधी शाहरुख खानचा देशवासियांना 'मोठा' संदेश; कॅडबरीने जारी केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 17:07 IST

Shah Rukh Khan Cadbury Ad after Corona Pandemic: लोकांनी या संदेशावरून शाहरुख आणि कंपनीचा स्तुती केली आहे. चांगला उपक्रम जारी केला असल्याचे म्हटले आहे. या जाहिरातीचा फायदा कॅडबरी कंपनीला होईलच परंतू स्थानिक व्यापाऱ्यांना देखील होईल असे अनेकांनी म्हटले आहे. 

सध्या शाहरुख खान मुलगा आर्यन खानमुळे मोठ्या संकटात आहे. तसेच चर्चेतही आहे. आर्यन हा मुंबईतील क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणात अडकला आहे. आर्यनचा ऑक्टोबर हा महिना तुरुंगातच जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शाहरुखला कोट्यवधी रुपयांचे नुकसानही झाले आहे. अनेक ब्रँडनी त्याच्या सोबतच्या जाहिराती नाकारल्या आहेत. परंतू शाहरुखचा एक व्हिडीओ कॅडबरीने जारी केला आहे. 

कॅडबरीने शाहरुख खानची एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात तुफान व्हायरल होत आहे. ही केवळ कॅडबरीची जाहिरात नाही, अशा कॅप्शनने ती जारी करण्यात आली आहे. या जाहिरातीत शाहरुख खान तुमच्या आजुबाजुच्या दुकानांतून या दिवाळीला वस्तू खरेदी करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा संदेश देत आहे. कपडे, चप्पल, चश्मा आदीपासूनच्या वस्तू या तुमच्या आजुबाजुच्या दुकानांमधून घेण्याचे आवाहन या जाहिरातीत करण्यात आले आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून मोठमोठ्या कंपन्या ते छोटी छोटी दुकाने अधिकतर काळ नुकसान झेलत आहेत. लॉकडाऊन मुळे बंद आहेत. यामुळे या छोट्या छोट्या दुकानांमध्ये गिऱ्हाईक नाहीय, तसेच दुकाने बराच काळ बंद असल्याने मालाचे नुकसान झाले आहे. या दुकानदारांनी पुन्हा नव्य़ा उमेदीने दुकानात माल भरला आहे. यामुळे त्यांची दिवाळी गोड करण्याचा संदेश या व्हिडीओतून देण्यात आला आहे. 

लोकांनी या संदेशावरून शाहरुख आणि कंपनीचा स्तुती केली आहे. चांगला उपक्रम जारी केला असल्याचे म्हटले आहे. या जाहिरातीचा फायदा कॅडबरी कंपनीला होईलच परंतू स्थानिक व्यापाऱ्यांना देखील होईल असे अनेकांनी म्हटले आहे. 

टॅग्स :शाहरुख खानकोरोना वायरस बातम्या